Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तिघी’ची आंतरराष्ट्रीय झेप! न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये क्लोजिंग चित्रपट म्हणून निवड

‘तिघी' हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. अशातच आता या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 10, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘तिघी’चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप
  • न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाची निवड
  • क्लोजिंग चित्रपटामध्ये मिळाले नामांकन
 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या गाजत असलेला ‘तिघी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. आशयघन कथा, प्रभावी सादरीकरण आणि दमदार अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरत असतानाच आता त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी झेप घेतली आहे. प्रतिष्ठित न्यू यॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव २०२६ (NYIFF) मध्ये ‘तिघी’ची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड झाल्याने मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

आई-मुलीच्या नात्यांतील भावनिक गुंतागुंत, न बोललेले संवाद आणि काळानुसार बदलणारी नाती यांचा अत्यंत सूक्ष्म आणि वास्तववादी वेध ‘तिघी’मध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता जागतिक प्रेक्षकांनाही सहजपणे जोडतो. मुंबईपासून ते न्यूयॉर्कपर्यंत, मानवी नात्यांच्या या कथा प्रत्येकाच्या मनाला भिडणाऱ्या ठरत आहेत.

शाहिद कपूरचा ‘O’Romeo’ आता ओटीटीवर; या क्राइम-रोमँटिक चित्रपटाचा जागतिक डिजिटल प्रीमियर

याआधी ‘पुणे ५२’, ‘जून’, ‘गोदावरी’ आणि ‘रावसाहेब’ या चित्रपटांनीही NYIFF मध्ये आपली छाप सोडली होती. ‘तिघी’ हा या निर्मितीसंस्थेचा पाचवा चित्रपट असून, यावेळी क्लोजिंग फिल्मचा मान मिळणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे. यामुळे आशयप्रधान मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने मिळणारी दखल अधिक ठळक झाली आहे.

दिग्दर्शिका जिजिविषा काळे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, “NYIFF सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात ‘तिघी’ची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड होणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हा चित्रपट अतिशय वैयक्तिक आणि भावनिक नात्यांवर आधारित असून, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे तो अधिक खास ठरतो आहे.”

तृप्ति डिमरीने रचला इतिहास, आलिया-दीपिकालाही टाकलं मागे; आता इंटरनॅशनल स्तरावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या प्रभावी अभिनयाने सजलेला ‘तिघी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात यशस्वीपणे प्रदर्शित होत असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे. या यशामुळे मराठी सिनेमाच्या कक्षा आणखी विस्तारल्या जात असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Web Title: Tighi selected as closing film new york indian film festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
2

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
3

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
4

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.