Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Sanju Rathod Nakhre Song: संजू राठोडचं ‘तुम मेरे हो’ चित्रपटातील ‘नखरे’ हे मराठी गाणं रिलीज झालं आहे. गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीयच्या केमिस्ट्रीसह गाण्यात संजूचा खास मराठी अंदाज पाहायला मिळतो.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 07, 2026 | 02:26 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sanju Rathod Nakhre Song : हिटमेकर संजू राठोड पुन्हा एकदा आपल्या खास मराठी अंदाजासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘तुम मेरे हो’ या आगामी चित्रपटातील ‘नखरे’ हे धमाकेदार मराठी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, या गाण्यात गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय यांची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. संजूचा खास आवाज, उत्साही बीट आणि आकर्षक हुकस्टेप यामुळे गाण्याची एनर्जी आणखी वाढली आहे.

संजू राठोडचा खास मराठी अंदाज

‘नखरे’ या गाण्यात संजू राठोडने आपल्या खास आवाजाच्या शैलीसोबत मराठी फ्लेवरचा तडका दिला आहे. उत्साही बीट आणि सहज लक्षात राहणारी हुकस्टेप हे गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे. गाणं ऐकताना आणि पाहताना प्रेक्षकांना थिरकायला लावणारा युथफुल अंदाज यात पाहायला मिळतो.

ईशा मालवीय आणि संजू राठोड पुन्हा एकत्र

संजू राठोड आणि ईशा मालवीय ही जोडी पुन्हा एकदा मराठी गाण्यासाठी एकत्र आली आहे. संजूचा दमदार आवाज आणि ईशाचा उत्साही परफॉर्मन्स यामुळे ‘नखरे’ला वेगळीच रंगत आली आहे.

गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय यांनी गाण्यातील आकर्षक हुकस्टेपवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि एनर्जेटिक अंदाज गाण्याची मजा आणखी वाढवतो.

Kiara Advani- Sidharth Malhotra: कियारा आणि सिद्धार्थ दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; मुलगी सरायासोबतचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

‘नखरे’बद्दल संजू राठोड काय म्हणाला?

गाण्याबद्दल बोलताना संजू राठोड म्हणाला, “‘नखरे’ हे गाणं करताना खूप मजा आली. माझ्या खास मराठी अंदाजाला या गाण्यात आणण्याचा आणि अशा भन्नाट बीट असलेल्या गाण्यावर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. हुकस्टेपमुळे गाण्याची मजा आणखी वाढली आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल अशी मला आशा आहे.”

गुरमीत म्हणाला, ‘गाण्याची एनर्जी खूप वेगळी आहे’

गुरमीत चौधरीनेही ‘नखरे’च्या शूटिंगचा अनुभव शेअर केला. त्याने सांगितलं की, गाण्याची एनर्जी खूप वेगळी असून शूटिंगदरम्यान सर्वांनी खूप एन्जॉय केलं. संजूने आपल्या खास मराठी शैलीचा सुंदर अंदाज गाण्यात आणल्यामुळे त्याला फ्रेश फील मिळाला असल्याचंही गुरमीतने म्हटलं.

ईशाला आवडला गाण्याचा मराठी फ्लेवर

ईशा मालवीयने ‘नखरे’मधील युथफुल व्हाइब आणि मराठी अंदाजाचं कौतुक केलं. संजूसोबत पुन्हा एकदा काम करणं खास असल्याचं सांगताना तिने गुरमीतसोबत हुकस्टेप करताना खूप मजा आल्याचं म्हटलं.

‘नखरे’ गाणं स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध

‘नखरे’ हे गाणं संजू राठोडने गायलं असून, यात गुरमीत चौधरी आणि ईशा मालवीय झळकत आहेत. हे गाणं आता स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झालं आहे. दरम्यान, ‘तुम मेरे हो’ हा चित्रपट २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Web Title: Sanju rathod nakhre song isha malviya gurmeet choudhary ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • sanju rathod

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
2

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
3

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
4

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.