(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सध्या चित्रपट कलाकारांबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. तसेच ते अनेकदा कायदेशीर अडचणीत अडकलेले दिसले आहेत. आता अशातच दिग्दर्शक विक्रम भट्ट चर्चेत आले आहेत. ते कायदेशीर अडचणीत सापडले आहेत आणि त्यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे समजले आहे. कारण या प्रकरणात ₹३० कोटींच्या फसवणुकीचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि ते कोणत्या अडचणीत अडकले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.
डॉक्टरांनी केले गंभीर आरोप
खरं तर, उदयपूरमधील एका डॉक्टरने विक्रम भट्टवर चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून ३० कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदार डॉक्टर म्हणाले की गुंतवणुकीच्या वेळी विक्रमने त्यांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २०० कोटींपर्यंत कमाई करण्याचे आश्वासन दिले होते. या दाव्याच्या आधारे, त्यांनी चित्रपटांसाठी एवढी मोठी रक्कम देऊ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Humane Sagar Death : ३४ वर्षीय प्रसिद्ध गायकाचे धक्कादायक निधन, गायकाच्या आईचे मॅनेजरवर गंभीर आरोप
भूपालपुरा पोलिस ठाण्यात दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय, त्यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित प्रस्तावित बायोपिकलाही या प्रकरणात सहभागी करण्यात आले. डॉक्टरांच्या तक्रारीवरून, ८ नोव्हेंबर रोजी भूपालपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टरांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये विक्रम भट्ट, त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट, त्यांची मुलगी कृष्णा भट्ट, स्थानिक रहिवासी दिनेश कटारिया आणि इतरांचीही नावे आहेत. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्याशिवाय ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश कटारियाने बैठक आयोजित केली
डॉक्टरांच्या तक्रारीनुसार, दिनेशने डॉक्टरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. दोघेही मुंबई चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या एका संगीत गटामार्फत भेटले. शिवाय, २०२४ मध्ये, डॉक्टर मुंबईतील एका स्टुडिओला भेटले, जिथे दिनेशने डॉक्टरची विक्रम भट्टशी ओळख करून दिली. पोलिस तक्रारीनुसार, दिग्दर्शकाने डॉक्टरांना आश्वासन दिले की तो संपूर्ण चित्रपट निर्मिती हाताळेल. तसेच आता या संपूर्ण प्रकाणामुळे दिग्दर्शक अडचणीत आला आहे.
पोलिसांचा तपास सुरु
एवढेच नाही तर त्यांनी डॉक्टरांना सतत निधी पाठवण्याची मागणी केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विक्रम यांनी डॉक्टरला वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगितलं. याच पद्धतीने 30 कोटींपेक्षा जास्त रक्कम त्यांनी दिल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ans: विक्रम भट्ट यांच्यावर ₹ 30 कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे.
Ans: हा आरोप Dr. मुरडिया यांच्या आयुष्यावर आधारित “Tumko Meri Kasam” नावाच्या बायोपिकशी निगडित आहे.






