Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'चिमणराव' या मालिकेतून प्रसिद्धी मिळवणारे गुंड्याभाऊची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 28, 2025 | 12:51 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठी अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन
  • वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • चिमणराव मालिकेतून मिळवली प्रसिद्धी

मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘चिमणराव’ या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांची गुंड्याभाऊची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.

नवीन हेअर स्टाईल, क्लीन शेव्हमध्ये दिसला ‘धुरंधर’ अभिनेता, दीपिकासोबत घेतले बाप्पाचे दर्शन; पाहा VIDEO

१९७९ साली दूरदर्शन प्रसारित झालेल्या चिमणराव या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली. त्यांना इंडस्ट्रीत गुंड्या भाऊ या नावानं ओळखलं जात असे. पुण्याचे इंजिनिअर ते अभिनेते असा त्यांचा प्रवास अविस्मरमीय होता. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’ हे होते, परंतु त्यांना सगळे बाळ या नावानं हात मारत असे. पुढेही याच नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्यक्षेत्रातील पहिले गुरू होते. अभिनेते बाळ कर्वे यांची चिमणराव ही भारतीय टेलिव्हिजनची पहिली मालिका होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वामी’ मालिका केली, या मालिके त्यांनी गंगोबा तात्या ही भूमिका साकारली. हे पात्रं देखील प्रेक्षकांना खूप आवडले. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे त्यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं आजही लोकप्रिय आहे. आणि हे गाणं प्रेक्षकांना अजूनही तितकेच आवडते.

अभिनेते बाळ कर्वे यांनी त्यांच्या कारकिर्दीत बन्याबापू 1978,लपंडाव 1993, गोडी गुलाबी 1991, चातक चांदणी 1992 हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट केले आहे. जे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. तसेच, उंच माझा झोका, प्रपंच, महाश्वेता, राधा ही बावरी, वहिनीसाहेब यांसारख्या लोकप्रिय मालिकेतील बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. आज बाळ कर्वे हे आपल्यात नसले तरी त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहणार आहे.

Web Title: Veteran marathi actor bal karve passed away chimrao fame gundya bhau

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi film

संबंधित बातम्या

‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?
1

‘Thamma’ नंतर, लगेच येणार ‘Shakti Shalini’, अनित पड्डा मुख्य भूमिकेत; चित्रपट कधी होणार रीलीज?

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”
2

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”

“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल
3

“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल

कसा आहे हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा ‘Ek Deewane Ki Deewaniyat’? जाणून घ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद
4

कसा आहे हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवाचा ‘Ek Deewane Ki Deewaniyat’? जाणून घ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.