अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रियाने खूप कमी वेळात स्वत:चं नाव सिनेविश्वात मिळवलं होतं. ज्या वयात तिने करियरची आणखी उंची गाठायला हवी होती त्याच वयात तिला कॅन्सरसारख्या आजाराने विळखा घातला. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. प्रिया जाऊन काही दिवस झाले मात्र अजूनही ती नाही यावर विश्वास ठेवणं तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना देखील जड जात आहे. प्रियाच्या आठवणी सांगताना अभिनेत्री मृणाल दुसानिस देखील भावूक झाली आहे.
मृणालने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रिया आणि तिच्या मैत्रीतले धम्माक किस्से सांगितले. प्रियाच्या आठवणी सांगताना मृणाल काहीही भावूक देखील झाली. प्रिया आणि मृणाल मैत्री घनिष्ठ होती. झी मराठी वाहिनीवरील तू तिथे मी या मालिका दोघींची चांगली मैत्री होण्याचं निमित्त ठरली. मालिकेत प्रिया खलनायिका होती मात्र ऑफस्क्रीन ती सगळ्यांच्या जीवाभावाची मैत्रीण होती. प्रिया मराठे, मृणाल दुसानीस, वंदना वाघनिस, राजश्री निकम यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती.
याच मैत्रीच्या आठवणी सांगताना मृणाल म्हणाली की, इतक्या जवळच्या मैत्रीणीचं जाणं अजूनही मान्य होत नाही. मोबाईल उघडला की सोशल मीडियावर प्रियाचे फोटो आणि व्हिडीओ दिसत असतात. आम्ही एकमेकींना वेडे अशी हाक मारायचो. बरं हे सुद्धा प्रियानेच सुरु केलं होतं.
मृणाल म्हणाली की, जेव्हा मी अमेरिकेत होते तेव्हा प्रिया तिथे आली होती. अमेरिकेत आल्यावर आमचं भेटायचंं ठरलं देखील होतं. फोनवर आम्ही बऱ्याचवेळ गप्पा मारल्या. पण नंतर लक्षात आलं की, आपण कुठे आणि कधी भेटाययचं हे ठरवलंच नाही. मी प्रियाला त्यानंतर पुुढचे काही दिवस कॉल देखील केले पण तिचा कॉल लागलाच नाही. त्यानंतर भारतात परतल्यावर तिने मला कॉल केलेला. तेव्हा प्रियाला खूप चिडलेली, मी तिची समजूत घातली की, अगं खूप कॉल केले पण लागलाच नाही. तेव्हापासून जे आमचं भेटणं राहिलं ते शेवटपर्यंत राहिलंच.
जेव्हा प्रियाची बातमी कळली तेव्हापासून अगदी आतापर्यंत आम्ही सगळे मित्रमैत्रीणी धक्क्यात आहोत. तिच्या कुटुंबातील आई आणि भावाची काय परिस्थिती असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. प्रियाचा नवरा शंतनू याला तर भेटण्याची हिंमतच होत नाही. प्रियाच्या आजारपणात त्याने तिची दिलेली साथ, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि आता प्रिया या जगात नाही. तो या सगळ्यातून कसा जात असेल याची कल्पना देखील करवत नाही, असं म्हणत अभिनेत्री मृणााल दुसानिसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.