फोटो सौजन्य - सोशल मिडिया (JioHotstar Reality)
आगामी भागामध्ये सलमान खान घरातलं सदस्यांवर संतापलेला दिसणार आहे. मागील आठवड्यामध्ये घरातल्या सदस्यांनी धुमाकूळ घातला एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. यावेळी या आठवड्यात स्पर्धकांमध्ये मोठे वाद पाहायला मिळाले. फरहाना भट्ट आणि नीलमगिरी या दोघींमध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळाला होता यावेळी फरहानाने नीलमला तिच्या व्यक्तिमत्त्वावर टीका केली होती. याच मुद्द्यावरून आता सलमान खान तिच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करतो.
कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये सलमान खान फरहानावर संतापलेला पाहायला मिळाला. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सलमान खान फरहाणाला म्हणतो की कोणत्या अँगलने तू पीस ऍक्टिव्हिस्ट वाटत आहेस? तुझा इगो एवढा मोठा आहे की तू स्वतःला काय समजतेस माहिती नाही. नीलम का डिझर्व करते दोन कवडीची सांगण्यासाठी? असा अनेक प्रश्न सलमानने उपस्थित केले.
पुढे सलमान म्हणाला की तू स्वतः एक महिला आहेस आणि तू एक महिलेबाबत असे म्हणतेस ते किती लज्जास्पद आहे. यावर फरहाना सलमान खानला म्हणते की मी त्यावेळी खूप रागात होते. तुला कळत नाहीये की तू यावेळी किती चुकीची गेली आहेस आणि तू एवढे सगळं बोलूनही अजूनही घरात आहेस हेच खूप मोठी गोष्ट आहे.
Iss Weekend Ka Vaar par Salman ne daali Farhana ke ego par spotlight, kya iske baad kar paayegi woh apna attitude right? 👀
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.
Watch Now: https://t.co/wpGGfH0z0T pic.twitter.com/QeEc5tL1QF
— JioHotstar Reality (@HotstarReality) September 6, 2025
सलमान खान या आठवड्यामध्ये घरातल्या सदस्यांवर संतापलेला दिसला आहे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रमाणामध्ये तो अमाल मलिक त्याचबरोबर गौरव खन्ना आणि आत्ता फरहाणा भट हिच्यावर देखील चिडलेला दिसला. आगामी भागामध्ये सलमान खान आणखी कोणते मुद्दे घरच्या सदस्यांसमोर मांडणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या दुसऱ्याच आठवड्यात सलमान खानचं हे रुद्र रूप पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. आगामी भागासाठी प्रेक्षक सोशल मीडियावर उत्सुकता आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
बिग बॉसच्या नवीनतम भागात, आवाजने नगमाला प्रपोज करून त्याचे प्रेम उघडपणे व्यक्त केले आहे. आवाजने टरबूजापासून हृदयाच्या आकाराचा केक बनवून आणि तो फुलांनी सजवून नगमाला अतिशय गोंडस पद्धतीने प्रपोज केले. अशनूर आणि घरातील इतर सदस्यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला.