Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर अपूर्वा आणि अंशुमनची बांधली रेशीमगाठ! वधू- वराचे लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

'आई कुठे काय करते' या प्रसिद्ध मालिकेमधील अपूर्वा गोरे या अभिनेत्रीने अखेर शाळा या मराठी चित्रपटामधील अभिनेता अंशुमन जोशीसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 08, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी कलाविश्वात सध्या कलाकारांच्या घरी लग्नसराईचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार नव्या आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहेत. नुकतेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचे लग्न पार पडले आहे. अभिनेत्री अपूर्वाने ‘शाळा’ चित्रपटामधील अभिनेता अंशुमन जोशी सोबत विवाहबंधनात अडकली आहे. सध्या या दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघेही फोटोमध्ये खूप सुंदर आणि एकमेकांसोबत आनंदी दिसत आहेत.

अपूर्वा आणि अंशुमन अडकले लग्न बंधनात

मराठी अभिनेत्री अपूर्वा गोरे आणि अभिनेता अंशुमन जोशी अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी नुकतीच लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नातील काही खास फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अपूर्वाने “श्री आणि सौ” अशी कॅप्शन देत हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अपूर्वा आणि अंशुमन यांच्या लग्नातील सुंदर क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. दोघांच्या या फोटोवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून सोशल मीडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

अनुराग डोभाल ICU मध्ये दाखल; इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान केला जीव देण्याचा प्रयत्न? मॅनेजरने दिली माहिती

लग्नसोहळ्यासाठी अपूर्वाने जांभळ्या काठाची हिरवी साडी परिधान केली होती. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मोजके दागिने, नाकात नथ, कपाळावर टिकली आणि मुंडावळ्या असा तिचा पारंपरिक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर अंशुमनने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. या जोडीचा साधा पण आकर्षक लूक चाहत्यांना खूप आवडला असून त्यांच्या लग्नातील फोटोंवर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नवदांपत्याच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी चाहत्यांनी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.

‘Tateeree’ गाण्याच्या वादानंतर Badshah ने मागितली माफी; सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवलं हरियाणवी गाणं

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अपूर्वा गोरेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेता अंशुमन जोशी याच्यासोबतच्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्या पोस्टनंतर या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून अपूर्वाच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. ग्रहमुख आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो विशेषतः चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होते. या सोहळ्यांमध्ये अपूर्वा आणि अंशुमन यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आता या दोघांचे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेकांनी या नवदांपत्याला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Apoorva gore anshuman joshi wedding photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • marathi actress
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
2

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
3

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.