Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिबट्याची दहशत दिसणार ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत, प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश

स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये यावेळी नवीन कलाकाराची नाही तर बिबट्याची एन्ट्री होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतून जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 24, 2025 | 12:19 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • बिबट्याची दहशत येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत
  • प्रेक्षकांना मिळणार जनजागृतीचा संदेश
  • राया-मंजिरीच्या आयुष्यात नवे संकट
 

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे, आणि अनेक निष्पाप नागरिकांनी यातून आपले प्राण गमावले आहेत. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि जनजागृतीचा गंभीर मुद्दा म्हणून हा विषय राज्यभर चर्चेत आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांच्या माध्यमातून विविध सामाजिक मुद्यांना नेहमीच हात घातला आहे. याच परंपरेला पुढे नेत येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये देखील बिबट्याची वाढती दहशत, सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम आणि बचावासाठी घ्यायची काळजी यावर दाखवले जाणार आहे.

सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. ऐन मेंदीच्या कार्यक्रमात बिबट्याच्या हल्याने गावात दहशत पसरणार आहे. याआधीही राया-मंजिरीच्या आयुष्यात अनेक संकटं आलेली दिसून आली आहेत. दोघांनीही एकमेकांची साथ देत या संकटाचा धैर्याने सामना केला आहे. बिबट्याच्या रुपात आलेल्या या नव्या संकटातून राया-मंजिरी कशी सुटका करणार हे मालिकेच्या पुढच्या भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘Anupama’ फेम मराठमोळ्या आश्लेषा सावंतने 23 वर्षाच्या Live In नंतर संदीप बास्वानशी केले लग्न, वृंदावन मंदिरात घेतली 7 वचनं

मालिकेतल्या या नव्या वळणाबद्दल सांगताना विशाल म्हणाला, ‘महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यामध्ये आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ऐकलं तरी अंगावट शहारे येतात. येड लागलं प्रेमाचं मालिकेतही बिबट्याच्या हल्ल्याने दहशत पसरणार आहे. अश्या परिस्थितीत घाबरून न जाता काय उपाययोजना केल्या जाव्यात यावर भाष्य केलं जाणार आहे. वनविभागाच्या सूचनांचे पालन करा. बिबट्या दिसल्यास वनविभागाला त्वरित कळवा लगेच जेणेकरून योग्य उपाययोजना करता येतील. बिबट्यांचा वावर असलेल्या परिसरात सतर्क रहा. एकट्याने जाणं टाळा, शक्य झाल्यास गटाने चला. रस्ते, घराचे प्रवेशद्वार आणि बाहेरील भाग पुरेशा प्रकाशात ठेवा. लहान मुलांना एकटे सोडू नका अश्या अनेक गोष्टी मालिकेच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रसंग साकारणं मोठी जबाबदारी असल्याची भावना विशालने व्यक्त केली. ‘

वाढदिवानिमित्त अमृताची खास पोस्ट! नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठे सरप्राईस, शेअर केली पोस्ट

तर मंजिरी म्हणजेच पूजा बिरारी म्हणाली, ‘बिबट्यांचे हल्ले, त्यामागील कारणं आणि बचावासाठीचे उपाय काय असावेत हा विषय मालिकेतून हाताळणं म्हणजे संवेदनशील पाऊल आहे असं वाटतं. सध्या बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावरामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे. भयाची वास्तविकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परिस्थितीचं गांभीर्य राखून आम्ही या विषयावर भाष्य करणार आहोत.’

Web Title: Yed lagla premacha leopard twist yed lagla premacha new episode raya manjiri leopard attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • Entertainment marathi
  • marathi serial news
  • star pravah

संबंधित बातम्या

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?
1

zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार
2

जय जय स्वामी समर्थ: स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नवा अध्याय, सावित्री आणि गौतमवर घातलेला धक्कादायक घाला उलगडणार

ईशा केसकर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून पडली बाहेर? नवी अभिनेत्री येताच ठोकला रामराम
3

ईशा केसकर ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतून पडली बाहेर? नवी अभिनेत्री येताच ठोकला रामराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.