(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपट विश्वात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. फॅशन, नृत्य आणि दर्जेदार अभिनयाने आजवर अमृताने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आणि तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक स्पेशल पोस्ट शेअर करून चाहत्यांना कोड्यात पाडल आहे. अमृताच्या पोस्टने आता चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. अभिनेत्री आता नवीन नक्की काय घेऊन येणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
आजवरच्या अभिनेत्रीच्या प्रत्येक कलाकृतीने तिने जगभरात प्रेक्षकांना मोहित केलं आहे. अभिनयाच्या सोबतीने अमृताने तिच्या फॅशन स्टेटमेंटने देखील इंडस्ट्रीत एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून नाव मिळाले आहे. अमृताच्या या बर्थडे पोस्टने आता प्रेक्षकांना एक वेगळा प्रश्न पडला असून ती काही नवीन प्रोजेक्ट करणार का ? नव्या वर्षात ती कोणत्या रूपात बघायला मिळणार ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अमृता खानविलकरने नुकताच तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे. सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटला आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अमृताने सगळ्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर त्यांचे आभार मानत म्हणाली, ‘माझ्या वाढदिवशी दिलेल्या इतक्या प्रेमासाठी, शुभेच्छांसाठी आणि उबदार मेसेजेससाठी……मनापासून धन्यवाद. तुम्ही दिलेला विश्वास, प्रेम आणि साथ — माझ्या प्रवासाची खरी ताकद आहे.’ तसेच नवीन खास काही मोठ्या प्रोजेक्टबद्दल देखील चाहत्यांना सांगितले.
अमृताने वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली, “तुमच्या सगळ्या प्रेमासाठी खूप आभार! नव्या वर्षात मी खूप कृतज्ञ पूर्ण पणे पाऊल टाकत आहे. नवी स्वप्न नवी ऊर्जा घेऊन ‘अमुल्य बाय अमृता’ हा नवा प्रवास सुरू करत आहे. कारण 2026 मध्ये माझ्या मनाच्या अगदी जळवची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येणार आहे.” असे लिहून अमृताने पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या सस्पेन्स पोस्टने आता सिनेविश्वात देखील चर्चा होताना दिसतात आणि प्रेक्षकांना या पोस्टमुळे 2026 मध्ये काय नवीन बघायला मिळणार या साठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’, ’36 डेज’, जीवलगा’, ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’, ‘चोरीचा मामला’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेत्रीने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. आणि आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.






