Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात अपघात झाल्यानंतर कश्मिरा शाहची तब्येत कशी आहे ? पोस्ट शेअर करत म्हणाली, “नाकावरील जखमेचे व्रण…”

गेल्या आठवड्यात १८ नोव्हेंबरला अमेरिकेतल्या लॉस एंजेलस शहरात अभिनेत्री कश्मिरा शाह हिचा भीषण अपघात झाला होता. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 24, 2024 | 03:17 PM
परदेशात अपघात झाल्यानंतर कश्मिरा शाहची तब्येत कशी आहे ? पोस्ट शेअर करत म्हणाली, "नाकावरील जखमेचे व्रण..."

परदेशात अपघात झाल्यानंतर कश्मिरा शाहची तब्येत कशी आहे ? पोस्ट शेअर करत म्हणाली, "नाकावरील जखमेचे व्रण..."

Follow Us
Close
Follow Us:

‘लाफ्टर शेफ’ शोच्या माध्यमातून कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाहने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. सध्या कश्मिरा शाह एका अपघातामुळे चर्चेत आली आहे. तिचा गेल्या आठवड्यात १८ नोव्हेंबरला अमेरिकेतल्या लॉस एंजेलस शहरात भीषण अपघात झाला होता. या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली होती. अभिनेत्रीने अपघात झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे.

विधानसभा निवडणूकीनंतरची तेजस्विनी पंडीतची पोस्ट; म्हणाली, “महाराष्ट्र हरलास तू…”

गेल्या चार दिवसांपूर्वी कश्मिरा शाहने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली होती. आता त्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नाकावरची पट्टी काढल्याची माहिती दिली आहे. पट्टी काढल्यानंतर तिच्या नाकावरची जखमेची खुण अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत फोटोमध्ये अमेरिकेतलेही डॉक्टरही दिसत आहेत. ती हसताना दिसत आहे. कॅप्शन शेअर करत अभिनेत्रीने आपली हेल्थ अपडेटही दिली आहे.

अमृताने तिच्या खास लोकांसोबत केला वाढदिवस साजरा! पाहा काही खास फोटो

कॅप्शन शेअर करत अभिनेत्री म्हणते, “अखेर नाकावरची पट्टी काढली आहे. जास्त मोठी नाकावरील जखमेचे व्रण राहणार नाही, हे ऐकून बरं वाटलं. आता वेळच सगळं नीट करेल. जखम वेगाने भरत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनेसाठी खूप आभार. कुटुंब आणि मित्रपरिवाराव्यतिरिक्त माझ्या बाजूने एवढी मोठी सोशल मीडिया फॅमिलीही आहे हे पाहून मला मोठा आधार मिळाला आहे. सगळ्यांना खूप प्रेम… आणि माझ्या प्रेमळ नवऱ्याचेही आभार जो अपघाताबद्दल समजताच लगेच फ्लाईट पकडून येणार होता. तू माझी मोठी सपोर्ट सिस्टिम आहेस. माझ्या डॉक्टरांचेही खूप आभार.”

 

कृष्णा अभिषेक आपल्या पत्नीसोबत आणि दोन मुलांसोबत लॉस एंजेलिसला गेला होता. पण कृष्णा अभिषेक आणि त्याचे दोन मुलं ७ नोव्हेंबरला भारतात आले. पण काही कारणास्तव कश्मिरा लॉस एंजेलिसला थांबली आहे. दरम्यान मॉलमध्ये फिरत असताना कश्मिरा आरशाला जोरात धडकली. काचा उडाल्याने तिच्या नाकाला मोठी जखम झाली. अतिशय भयानक असा हा अपघात होता. रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो कश्मिराने १८ नोव्हेंबरला शेअर केला होता. आता अपघातानंतर अभिनेत्री भारतात केव्हा येणार? हे अद्याप अस्पष्ट आहे. कश्मिराने ‘लालबाग परळ’, ‘शिकारी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून ती हिंदी फिल्मइंडस्ट्रीतही सक्रिय आहे.

सखी गोखलेचा लुक पाहून चाहते चक्रावले! नजर टाका काही फोटोंवर

Web Title: May not have a scar kashmera shah gives health update after recent fatal accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 03:17 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.