
'मदर्स डे'स्पेशल चित्रपटांची झलक पाहायला मिळणार ओटीटीवर, आईचं अपार प्रेम असलेल्या सिनेमांची वाचा यादी
आईचं नातं – हे केवळ प्रेमाचं नाही, तर त्याग, सामर्थ्य आणि निस्वार्थपणाचं प्रतीक आहे. हाच भाव समजून घेऊन अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर संपूर्ण मे महिना “आई विशेष चित्रपट महोत्सव” साजरा होणार आहे. या उपक्रमांतर्गत, आईच्या विविध रूपांना उजाळा देणाऱ्या मराठी चित्रपटांचा खास संग्रह प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
भारत- पाकिस्तान तणावाचा मनोरंजन विश्वावर परिणाम, आणखी एक कार्यक्रम आयोजकांकडून स्थगित
या सिनेमा विश्वात मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या लक्षवेधी भूमिका पहायला मिळणार आहेत. दुर्गा खोटे यांचा ‘धरतीची लेकरं’ मधील सोज्वळ आईपण आणि मातीशी असलेली नाळ दाखवणारा अभिनय विशेष आहे. मधु कांबीकर यांनी ‘गोंद्या मारतय तंगडं’ आणि ‘होऊन जाऊ दे’ या चित्रपटांत समाजाशी लढणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध उभी राहणाऱ्या आईचं रूप साकारलं आहे. तर रीमा लागू यांची ‘रेशीमगाठ’ आणि ‘सैल’ चित्रपटामधील भूमिका अंतर्मुख करणारी आहेत. या सर्व भूमिकांतून संयमी आणि भावपूर्ण आईचं चित्रण होतं.
“जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते”, इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव
उषा नाडकर्णी ‘निर्मला मच्छिंद्र कांबळे’ चित्रपटामधील साधी पण जिव्हाळ्याची आई प्रेक्षकांच्या मनात घर करते. भक्ती आणि श्रद्धेचं रूप म्हणजे ‘कानबाई माझी नवसाची’ आणि ‘माय माऊली मनुदेवी’ या चित्रपटातील अलका कुबल यांची पात्रं म्हणजे साक्षात देवीआईचं रूप. आई केवळ जन्म देणारी नसते, तर आधार देणारी असते हे ‘आश्रय’ मधून निशिगंधा वाड यांनी अधोरेखित केलं आहे. परंपरा, संस्कार आणि प्रेमाचा वारसा पुढच्या पिढीला देणारी आई सुकन्या कुलकर्णी यांनी ‘वारसा लक्ष्मीचा’ मध्ये सुंदरपणे साकारली आहे. तर चित्रा देशमुख यांची ‘कुलस्वामिनी’ चित्रपटा मधील देवीमय आई संकटात मार्गदर्शक ठरते.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सादर होणाऱ्या या चित्रपटांमधून आईच्या प्रेमाचं, संघर्षाचं आणि तिच्या अस्तित्वाचं सुंदर चित्रण होतं. आणि म्हणून ‘मे’ महिना संपूर्णपणे आईला समर्पित करण्यामागचा हेतू म्हणजे प्रेक्षकांनी त्यांच्या आठवणी, भावना आणि आपुलकी या चित्रपटांमधून अनुभवाव्यात.”
अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप हे गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिले आहे. व्हीएचएस च्या काळापासून आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनले आहे.