फोटो सौजन्य: Social Media
काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूर आणि नर्गिस फाखरीचा रॉकस्टार हा सिनेमा चित्रपटगृहंत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनी हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती. चित्रपटातील क्लायमॅक्स पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. पण तुमच्या आमच्या सामान्य प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न साहजिकच आला असेल. तो म्हणजे एकीकडे रणबीर कपूर ऍनिमल सारख्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकत आहे, पण दुसरीकडे अचानक नर्गिस फाखरीच्या करिअरचे पुढे काय झाले? याचे उत्तर स्वतः नर्गिसने दिले आहे.
नर्गिस फाखरी आपल्या तब्येतीच्या समस्यांबाबत म्हणाली की तिच्या आजारपणामुळे तिने स्वत:ला बॉलिवूडपासून दूर केले आहे. ती 8 वर्षांपासून सतत बॉलिवूडमध्ये काम करत होती. सततच्या कामामुळे तिला आर्सेनिक, लीड पॉइजनिंग, तणावामुळे होणारे शारीरिक आजार यांसह अनेक आरोग्य समस्यांनी ग्रासले होते. ती जेव्हा भारतात आली तेव्हा तिला आर्सेनिक आणि लीड पॉइजनिंग झाले होते. यानंतर तिने स्वतःला सावरले.
हे देखील वाचा: महिलांमध्ये वाढत आहे Thyroid Cancer चे प्रमाण, जाणून घ्या लक्षणं आणि राहा सुरक्षित
आपल्या शारीरिक समस्यांबाबत नर्गिस फाखरी म्हणाली की बॉलीवूडमध्ये काम करताना ती मानसिक आणि शारीरिक तणावामुळे अस्वस्थ झाली होती. त्याने सांगितले की, त्यालायामुळे तिला अनेक शारीरिक व्याधी जडले, ज्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात अडथळे निर्माण होत होते.
तणावामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत नर्गिस म्हणाली की तिने आठ वर्षे दररोज काम केले आणि क्वचितच तिच्या कुटुंबासोबत राहिली. तिने सांगितले की तणावामुळे तिला अस्वस्थ वाटत होते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. बरे होण्यासाठी तिने दोन वर्षांसाठी आराम करायचे ठरवले. मात्र आर्सेनिक आणि लीड पॉइजनिंगमुळे तिला अमेरिकेला परतावे लागले.
हे देखील वाचा: हिवाळा आला उंबरठयावर; वाढत्या थंडीचा शरीरावर होतो परिणाम? जाणून घ्या
डीएनएला दिलेल्या मुलाखतीत, नर्गिस म्हणाली, जेव्हा हा आजार झाला होता तेव्हा माझ्यासोबत काय झाले हे कोणालाही माहित नव्हते.डॉक्टरांनी जेव्हा माझी टेस्टिंग केली, तेव्हा ते देखील घाबरले होते कारण आजार उच्च पातळीवर पोहचला होता. पण पुढे टेस्टिंग करताना माझी स्तिथी नॉर्मल होती.