फोटो सौजन्य - Social Media
हिवाळ्याला काहीच दिवस उरले आहेत. एकंदरीत, हिवाळा उंबरठ्यावर आहे. अशामध्ये वाढत्या थंडीचा आपल्या शरीरावर अनेक परिणाम जाणवून येतात. या थंडीने अनेकांचे आरोग्य विस्कळीत होते. अशा दिवसात आपल्या आरोग्याला जपणे फार आवश्यक असते. अन्यथा, याचे वाईट प्रतिसाद आपल्या शरीरावर उमटतात. थंडीच्या दिवसात शरीरामध्ये अनेक प्रकारचे इन्फेक्शन होत असतात. हृदयविकाराचा धक्का तसेच स्ट्रोकचा धोका या दिवसांमध्ये जास्त असतात. त्यामुळे, या दिवसात जास्त खबरदारी घेण्याचे सांगितले जाते.
हे देखील वाचा : रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात असलेली ‘ही’ एक गोष्ट दुधात मिसळून प्या, या समस्यांपासून मिळेल आराम
हाईपोथर्मिया : जास्त थंडीचा वातावरणामध्ये शरीराला हाईपोथर्मियाचा त्रास होतो. यामध्ये त्वचेचा रंग उडू लागतो. एकंदरीत, त्वचा निळ्या रंगाची दिसू लागते. श्वास कमी होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. नसांमध्ये रक्ताचा दबाव कमी होत जातो. कधी काळी तर व्यक्तीला चक्कर येण्याचे प्रमाण असते. या परिस्थितीमध्ये शरीरामध्ये कंपन जाणवते. शरीर एका भ्रमात जाते तसेच आपल्यासोबत काय घडतंय? याची जाणीवदेखील होत नाही.
फ्रॉस्टबाइट : थंडीच्या दिवसात ही स्थिती उद्भवू शकते. अतिशय थंडी वाजणे, शरीर सुन्न होणे, त्वचेच्या रंगामध्ये फरक जाणवणे, मांसपेश्यांमध्ये दुखणे या सर्व बाबी फ्रॉस्टबाइटचे लक्षण आहेत. थंड वातावरणाच्या जास्त संपर्कात आल्याने या गोष्टी घडतात.
रक्ताचे घट्ट होणे : अतिशय थंडीच्या संपर्कात आल्याने रक्त घट्ट होण्याचे प्रमाण जास्त असते. शरीराला अतिशय थंडावा जाणवल्या नंतर अशा गोष्टी घडण्यास सुरुवात होते. याने हृदयविकाराचा त्रास होतो. तसेच स्ट्रोकसारखी समस्या उद्भवू शकते.
ट्रेंच फूट : ट्रेंच फूट ही पायांच्या तळव्यांसंबंधित गंभीर स्थिती आहे. या स्थितीत तळव्यांची त्वचा खराब होते. तेथील मांसपेशीना देखील मोठा फटका बसतो. बहुतेक ज्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते.
हे देखील वाचा : जास्त कंघी केल्याने केस का गळतात? केस विंचरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
त्वचेसंबंधित त्रास : हिवाळयात त्वचा फार सहन करते. त्वचेला फार त्रासाला सामोरे जावे लागते. त्वचे ड्राय होत जाते. सुखी त्वचा असणाऱ्या लोकांचे सुख या दिवसात काही प्रमाणात कमी होते. कारण त्यांची त्वचा या दिवसात काही जास्तच सहन करत असते. बहुतेक जणांच्या त्वचेचा रंग बदलतो.
हिवाळ्यात आपल्या शरीराला वरील त्रासांना सामोरे जावे लागते. असे विकार किंवा स्थिती आपल्याला होण्याची शक्यता असते. या वातावरणात आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी करणे महत्वाचे ठरते.