महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात प्राजक्ता माळीचा होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द! VIDEO शेअर करत म्हणाली...
आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीनिमित्त नाशिक जवळ असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीला Prajakta Mali ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पण काल (२५ नोव्हेंबर) प्राजक्ताने सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना माहित दिली. त्यानंतर हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे पाहता आता प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी अभिनेत्रीने आता माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे.
प्राजक्ताने माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आज त्र्यंबकेश्वर मंदिरात पार पडणाऱ्या नृत्य कार्यक्रमात ती सहभागी होणार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात तिची टीम यावेळी नृत्याचं सादरीकरण करेल पण ती त्या नृत्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. कार्यक्रमामुळे झालेले वाद, मिळालेली अनावश्यक प्रसिद्धी, त्यामुळे होणारी गर्दी आणि त्याचा प्रशासनावर पडणारा ताण याचा विचार करत अभिनेत्रीने हा निर्णय घेत असल्याचं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
Don 3 : रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’ चित्रपटाचे शूटिंग या वर्षी होणार सुरू, फरहान अख्तरने केली पुष्टी!
प्राजक्ता माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाली की, “नमस्कार, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाशिवरात्रीनिमित्त होणारा त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम ‘शिवार्पणमस्तु’. पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी दयायची नाही असं ठरलं होतं. कारण, मंदिराचं प्रांगण, तेथील क्षेत्रफळ, तिथे माणसं कार्यक्रमावेळी कितीजण बसू शकतात याचा विचार केला गेला होता. मी सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयी अजिबात माहिती दिली नव्हती आणि त्या गोष्टीला मी प्रसिद्धी दिली नव्हती. परंतु काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे.”
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समांथा प्रभुने लव्हलाईफबद्दल केलं भाष्य; म्हणाली, “माझं पहिलं प्रेम…”
“त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून मी हा निर्णय घेतलाय की, शब्द दिला आहे म्हणून हा कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार तिथे नृत्य सादर करतील पण माझ्याशिवाय. अर्थातच यामुळे माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे. पण वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त महत्त्वाची आणि मोठी वाटते. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे आणि हा निर्णय मी घेतेय. अर्थातच, जिथे भाव असतो तिथे देव असतो असं मला वाटत त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी ती शिवापर्यंत पोहोचणार आहे. तिथे कुणाचाही हिरमोड होऊ नये आणि कुणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये म्हणून माहितीकरता मी हा व्हिडीओ बनवतेय. हर हर महादेव.”