फोटो सौजन्य: सोशल मीडिया
केव्हा खासगी तर केव्हा फिल्मी लाईफमुळे चर्चेत राहणारी समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समांथा सिंगल लाईफ जगते. अभिनेत्री मायोसिटिस नावाच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे ती वर्षभर फिल्म इंडस्ट्रीपासून दुर होती. ‘सिटाडेल: हनी बनी’सीरीजच्या माध्यमातून अभिनेत्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करताना अभिनेत्रीने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दलचा खुलासा केला आहे.
समीर चौघुले आणि सई ताम्हणकरची हटके जोडी पहिल्यांदाच येणार एकत्र
‘न्युज २४’ला दिलेल्या मुलाखतीत समांथाने तिच्या अपकमिंग प्रोजेक्टबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की ती लवकरच ‘बंगाराम’ चित्रपटातून निर्माती म्हणून पदार्पण करणार आहे. याशिवाय, ती तिची बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘रक्त ब्रह्मांड’ देखील तयार करणार आहे. ही सीरीज सध्या निर्मितीच्या टप्प्यात असल्याची माहिती आहे.
एकता कपूरची नवीन ‘नागिन’ कोण असणार ? ‘या’ 5 अभिनेत्रींमध्ये आहे जबरदस्त टक्कर
समांथा प्रभूने ‘न्युज २४’ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले की, “मला लवकरच ‘रक्त ब्रह्मांड’ सीरीज संपवायची आहे. पुढच्या महिन्यात रिलीज होणाऱ्या इतर चित्रपटांचे काम पूर्ण करायचे आहे. मला येत्या एक-दोन महिन्यांत बरेच काम पूर्ण करायचे आहे. मला वाटते की माझे चित्रपटांपासूनचे अंतर आता संपले आहे. हे माझे पहिले प्रेम आहे.” असं समांथा मुलाखतीदरम्यान म्हणाली.
‘सिकंदर’च्या रिलीजपूर्वी निर्मात्यांनी केला मास्टर प्लॅन, चित्रपटाचे सुरु झाले अॅडव्हान्स बुकिंग?
समांथा प्रभूने पुढे मुलाखतीत तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना सांगितले की, “समांथा सिंगल आहे. मला वाटत नाही की मी माझ्या लव्ह लाईफबद्दल पुन्हा कोणाशीही काही बोलेन. हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, तो खूप खाजगी ठेवण्याचा मी विचार केला आहे. मी त्यावर पुन्हा बोलणार नाही.”