Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 27, 2025 | 07:54 PM
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती, जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक २६ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात भव्य नाट्य-संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, अहिल्याबाईंच्या जीवनकार्यावर आधारित नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा संगम साकारण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश अहिल्याबाईंच्या सामाजिक, प्रशासनिक व सांस्कृतिक योगदानाचा गौरव करत नव्या पिढीपुढे त्यांचे आदर्श नेतृत्व प्रभावीपणे सादर करणे हा होता. कार्यक्रमास सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज, अभ्यासक, कलाकार आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लिखाणाने सजलेलं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या रुपात येतंय, केव्हा आणि कुठे होणार पहिला प्रयोग ?

कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन व क्युरेशन संगीत नाट्य अकादमीच्या डॉ. संध्या पुरेचा यांनी केली असून, यामध्ये विवेक आपटे व सुभाष सैगल यांच्या संहितेला अजीत परब यांचे संगीत लाभले. सुभाष नकाशे यांचे नृत्यदिग्दर्शन आणि हरिश भिमानी यांचे प्रभावी निवेदन कार्यक्रमाला सुसंवादी आकार देत होते.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे नेतृत्व, न्याय आणि संस्कृती यांचा मूर्तिमंत आदर्श. आजचा कार्यक्रम ही त्यांच्या जीवनकार्याची एक जिवंत आठवण होती. पुढच्या पिढ्यांनी अहिल्याबाईंच्या कार्याची ओळख केवळ पाठ्यपुस्तकांतून नव्हे, तर अशा सांस्कृतिक सादरीकरणांमधून घ्यायला हवी. हीच खरी आदर्श नायिकेची ओळख आहे. डॉ. संध्या पुरेचा यांनी यावेळी असे सांगितले.

खरंच! छोटा पुढारीचं निधन? बिग बॉस अभिनेत्याचा हार घातलेले फोटो व्हायरल

सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटरच्या भावना शहा म्हणाल्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच जीवनकार्य हे केवळ आदर्श स्त्री नेतृत्वाचं प्रतिक नाही, तर सामाजिक न्याय, मूल्यनिष्ठा आणि माणुसकीचे मूर्त स्वरूप आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतून आजच्या समाजाला दिशा मिळते. अशा कार्यातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळणं हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली आहे.” कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान दिल्याबदल सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम ट्रेनिंग इस्न्टिट्यूटच्या विश्वस्तांचे त्यांनी आभार देखील मानले.

“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत

सर्वात विशेष ठरले ते म्हणजे अहिल्याबाईंच्या नेतृत्वगुणांचे नाट्यात्मक सादरीकरण, ज्यात त्यांनी प्रशासन, मंदिर उभारणी, सामाजिक न्याय, विधवांचे पुनर्वसन आणि स्त्रीसक्षमीकरण यामध्ये दिलेल्या योगदानाचे सादरीकरण प्रभावीपणे झाले. कार्यक्रमानंतरही अनेक प्रेक्षक सभागृहातच थांबून कलाकारांच्या अभिनयाने भारावून गेले होते. हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक प्रवास ठरला, ज्याची चर्चा सांस्कृतिक वर्तुळात अनेक दिवस रंगणार हे निश्चित!

Web Title: Punyashlok ahilyabai holkar 300th birth anniversary cultural program organized on the occasion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra culture

संबंधित बातम्या

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?
1

“मी किती निकालपत्रे लिहू?”  धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्याविरुद्धच्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी असे का म्हटलं?

राज्यातील सर्व शहरांमध्ये धूलिकण मर्यादा ओलांडली; वायू गुणवत्ता ‘मानकां’ पेक्षा अधिक
2

राज्यातील सर्व शहरांमध्ये धूलिकण मर्यादा ओलांडली; वायू गुणवत्ता ‘मानकां’ पेक्षा अधिक

Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले
3

Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक
4

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.