Shraddha Kapoor Wrote A Poem On Love Actress Shared A Post
‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री श्रद्धा कपूरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाने श्रद्धाने चाहत्यांचे मन जिंकलं. श्रद्धा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात असते. काही तासांपूर्वीच श्रद्धाने एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. त्यामध्ये तिने एक कविता लिहिलीय. तिने शेअर केलेल्या कवितेने चाहत्यांचं लक्ष वेधलेय.
हताश झालेल्या इशानची ‘अशोक मा.मा.’ कशी समजूत काढणार ?
सिंपल राहणीमान असलेल्या श्रद्धाची सध्या इन्स्टा स्टोरीवरील कविता कमालीची चर्चेत आली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये श्रद्धाने कविता लिहिलीये की,
“जब तुम अकेले हो,
मैं तुम्हारे पास बैठ जाऊंगी
जब तुम उदास हो
मैं तुम्हे बाहों में भर लूंगी
मुझे पता हैं तुम खो जाते हों
मुझे पता हैं तुम भाग जाते हों
लेकिन मैं तुम्हें धुंड लूंगी
और तुम्हे थाम लूंगी”
ही कविता श्रद्धाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिली आहे.
“जब तुम उदास हो…” श्रद्धा कपूरने कोणासाठी व्यक्त केल्या भावना, अभिनेत्रीने लिहिलेली सुंदर कविता चर्चेत
पिंगा गर्ल्सला मिळणार नवा चॅलेंज, वल्लरीच्या सासुबाईंचा कसा करणार सामना ?
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री शेवटची १५ ऑगस्टला रिलीज झालेल्या ‘स्त्री २’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालासुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी अभिनेत्री रणबीर कपूरसह ‘तू झूठी में मक्कार’ चित्रपटात झळकली होती. यातील रणबीर व श्रद्धा यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटातून मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.