(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा माजी पती आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची तिसरी पत्नी सना जावेद हिने त्याच्याशी घटस्फोट घेतल्याच्या बातम्या सध्या अनेक माध्यमांतून समोर येत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये लग्नाची घोषणा करत या जोडप्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये शोएब मलिक चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसतोय, तर त्याच्या शेजारी उभी असलेली सना जावेद पूर्णपणे तोंड फिरवून उभी आहे. दोघं एकमेकांकडे पाहत नाहीत, कोणतीही संवाद साधलेला दिसत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरून तणाव स्पष्ट जाणवतोय.या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. काही युजर्सना वाटतं की, दोघांमध्ये गंभीर वाद सुरू आहे आणि कदाचित गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. तर काहींच्या मते, हे फक्त नवरा-बायकोमधील सामान्य भांडण असू शकतं, जे लवकरच मिटेल. अश्या दोन प्रकराच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
Bigg Boss 19 : “घराबाहेर काढूनच दाखव!” , कॅप्टन्सी टास्कमध्ये प्रणीत-बसीरमध्ये खडाजंगी
The Siasat Daily च्या माहितीनुसार, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि त्याची तिसरी पत्नी, अभिनेत्री सना जावेद यांच्यात सध्या काहीही ठीक सुरू नसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येतं की हे दोघं सध्या घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहेत.सध्या तरी या दोघांपैकी कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. पण चाहत्यांमध्ये त्यांचं नातं टिकणार की नाही याबाबत सध्या मोठी उत्सुकता आहे.
Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचं लग्न एप्रिल 2010 मध्ये मोठ्या धुमधडाक्यात झालं होतं. हा एक सीमा-पार विवाह म्हणून खूप चर्चेत राहिला. मात्र, 2024 च्या सुरुवातीलाच या नात्याचा अंत झाला.सानियाच्या कुटुंबाने याची पुष्टी केली होती की, शोएबने काही महिन्यांपूर्वीच गुपचूप घटस्फोट घेतला होता. घटस्फोटामागचं कारण त्यांनी उघड केलं नाही.
घटस्फोटाची बातमी समोर येताच, शोएबने अचानक पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केल्याची घोषणा केली. ज्याने चाहत्यांना अक्षरशः चकित केलं. दोघांचं लग्न इतकं अनपेक्षित होतं की, लोकांनी लगेचच अंदाज बांधायला सुरुवात केली,माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, शोएब आणि सना यांचं अफेअर सानिया मिर्झाशी लग्न असताना सुरू झालं होतं, असं बोललं जातं. मात्र, या दोघांनीही कधीही या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.