Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझं नाव, परिचय सांगितला आणि…” प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक…

मराठी सिनेसृष्टीत दिग्गज खलनायकांपैकी एक प्रसिद्ध राहिलेले राजशेखर आज चर्चेत आले आहेत. त्यांच्या नातवाने त्यांच्यासाठी खास एक सुंदर पत्र लिहिलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 04:08 PM
"माझं नाव, परिचय सांगितला आणि..." प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक...

"माझं नाव, परिचय सांगितला आणि..." प्रसिद्ध खलनायकाच्या नातवाने लिहिले खास आजोबांसाठी पत्र, जुन्या आठवणींत नातू भावुक...

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत दिग्गज खलनायकांपैकी एक प्रसिद्ध राहिलेले राजशेखर आज चर्चेत आले आहेत. त्यांच्या नातवाने त्यांच्यासाठी खास एक सुंदर पत्र लिहिलं आहे. राज राजशेखर याने आपल्या आजोबांना लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज राजशेखरने आपल्या आजोबांच्या जयंतीनिमित्ताने हे भावुक पत्र लिहिलं आहे.

हे देखील वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा ट्रेलर केव्हा रिलीज होणार ? प्रदर्शनाच्या महिनाभर आधीच चित्रपट परदेशात करतोय कोट्यवधींची कमाई

राजने आपल्या आजोबांबरोबरचे फोटो एकत्र करून शेअर करत एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राजने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजने पत्रात लिहिलंय की, “प्रिय आजोबा पत्र लिहिण्यास कारण की, साधारणपणे २०१२ मधील पुण्यातली ही गोष्ट आहे. माझी नुकतीच दहावी झाली होती. फर्ग्युसन महाविद्यालयातचं शिकण्याचा माझा हट्ट होता, त्या दृष्टीने प्रयत्न करून दाखला देखील मिळवला आणि उगवला माझ्या कॉलेजचा पहिला दिवस. पहिल्याच दिवशी वर्गात विद्यार्थी परिचय. बाकीच्या मुलांचा इंट्रो झाला, मग मी पुढे आलो. माझं नाव सांगितलं आणि माझ्याबद्दलचा परिचय दिला. तोच एका-एक माझ्या अवती-भवती लोकांचा गराडा जमला.”

 

“जणू मी कोणीतरी मोठा स्टार आहे आणि या अनोळखी शहरात एका क्षणात ओळखीची अशी कैक नाती निर्माण झाली. बरं आज हा किस्सा सांगायचं कारण म्हणजे, तुम्ही परलोकात राहून मी परगावी असताना दिलेला हा मला आशीर्वाद होता. कारण तो जमलेला गराडा हा ‘राज’ नंतरच्या ‘राजशेखर’ मुळे होता. आणि हे मान्य करण्यात मला सार्थ अभिमान आहे. त्या अनोळखी शहरात तुमच्यामुळे नाती जोडणं सोप्पं झालं आणि बाबांच्या संस्कारांमुळे ते टिकवणं मला जमलं. आजोबा तुम्ही जरा लवकरच गेलात नं… हो ठाऊक आहे मला शरीर रूपानेचं गेला आहात… पण तरी! आजोबा… खूप जगायचं होत हो तुमच्या सोबत… आयुष्यातील सर्व कांड सांगायचे होते… क्राफ्ट सुधारण्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न विचारायचे होते.. तुमचं सिनेमा बद्दलचं म्हणनं जाणून घ्यायचं होतं…”

हे देखील वाचा – विक्रांत मेस्सीने KBC 16 च्या हॉटसीटवरून सांगितली संघर्षगाथा, अभिनेत्याच्या जीवनातला ‘तो’ किस्सा ऐकून बिग बींनी वाजवल्या टाळ्या…

“तुमच्या नजरेतून तुमचे गुरु ‘भालजी पेंढारकर’ अनुभवायचे होते. मी लिहिलेल्या कथा वाचून दाखवायच्या होत्या, तुमच्या सोबत मैफिलीत बसून माझ्या कविता ऐकवायच्या होत्या! हो मला ठाऊक आहे तुम्ही वरून हे सर्व काही पाहत आहात. मी कुठे अडकलो तर तुम्हीच जादूची कांडी फिरवता आणि माझ्या सर्व अडचणी दूर करता. सगळं- सगळं ठाऊक आहे मला… पण तरी ! हे ‘तरी’ आहे नं तेच बोचतं खूप! पण तुम्ही देखील पक्के हुशार होतात हं! ‘बाबांच्या नजरेतून’ माझ्याशी बोलता, ‘राहूल चाचुच्या देहबोलीतून’ आजूबाजूला दिसता, आणि ‘आज्जीच्या मिठीत मायेची उब’ बनून तुम्हीच असता… तुम्ही पण काही कमी नाही. नातवाची आठवण झाली की तुमच्या उर्जेची जाणीव या नं त्या मार्गाने मला देऊन जाताचं! आजोबा…. मी, बाबा, आज्जी आणि खास करून राहूलचाचू आम्ही सगळे तुमची आठवण काढतो! तुमच्या आठवणीत राहतो! जर-तर च्या गोष्टी होतात, आणि प्रत्येकाचे त्या दृष्टीने स्वत:चे सिनेमे सुरु होतात. आमचे आमचे स्वतंत्र सिनेमे असले तरी त्या सिनेमात ‘नायक’ हा ‘राजशेखरचं’ असतो! असो…. बाकी HAPPY BIRTHDAY ‘बर्थडे पार्टनर’…लव यु ”

Web Title: Raj rajshekhar emotional letter written to grandfather rajshekhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.