अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा ट्रेलर केव्हा रिलीज होणार ? प्रदर्शनाच्या महिनाभर आधीच चित्रपट परदेशात करतोय कोट्यवधींची कमाई
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक चित्रपटासाठी उत्सुक आहेत. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आता अशातच चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर ट्रेलर रिलीज केव्हा होणार याची चर्चा सुरू आहे.
निर्मात्यांसह, दिग्दर्शक आणि कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनची जबरदस्त तयारी केली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कलाकार प्रमोशनला सुरुवात करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, येत्या १५ नोव्हेंबरला मुंबईमध्ये चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. ट्रेलरनंतर निर्माते चित्रपटातील आणखी दोन गाणी रिलीज करणार असल्याची माहितीही मिळाली आहे. चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीज होण्याआधीच अल्लु अर्जुनच्या ह्या चित्रपटाचे अमेरिकेत हजारो तिकीट विकले आहेत. चित्रपटाच्या रिलीजला अजून महिना बाकी आहे. तोच चित्रपटाचे आतापर्यंत १५,००० हून अधिक तिकिटे विकले गेले आहेत.
अमेरिकेत ‘पुष्पा २’ ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर भारतात ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून अमेरिकेत एवढ्या लवकर १५ हजार तिकिटे विकली जाणारा ‘पुष्पा २’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. यातून चित्रपटाने तब्बल ५०० कोटी डॉलरची कमाई केली आहे. याबाबत पुष्पाच्या मेकर्सकडून माहिती देण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० हून अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे. निर्माते चित्रपटाचे संपूर्ण भारतात जोरदार प्रमोशन करणार असल्याचे बोलले जात आहे. ‘पुष्पा’च्या तुलनेत ‘पुष्पा 2’ हिंदीत अधिक चांगली कामगिरी करेल, असे बोलले जात आहे. या चित्रपटाचे एक खास गाणे शूट केले जात आहे. या गाण्यात श्री लीला दिसणार आहे. गाण्यात श्री लीलासोबत अल्लू अर्जुनही दिसण्याची शक्यता आहे. सध्या चित्रपटाचे एडिटिंगचे काम सुरू आहे.