विक्रांत मेस्सीने KBC 16 च्या हॉटसीटवरून सांगितली संघर्षगाथा, अभिनेत्याच्या जीवनातला 'तो' किस्सा ऐकून बिग बींनी वाजवल्या टाळ्या...
अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीग बी या शोच्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळत आहे. कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलेला 12th Fail अभिनेता विक्रांत मेस्सीने शोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्यासोबत आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्माही उपस्थित होते. अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि अभिनेता विक्रांतने बिग बींसोबत शो खेळ खेळला. यावेळी खेळ खेळत असताना अभिनेत्याने बिग बींसोबत आणि आपल्या फॅन्ससोबत एक इमोशनल स्टोरी शेअर केली.
२०२३ मध्ये आलेल्या 12th Fail चित्रपटात विक्रांतने मनोजची भूमिका साकारली आहे. विक्रांत त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाची गाथा सांगत असताना अभिनेत्यासह आणि बिग बींसह उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी तरळले. हा व्हिडिओ सोनी टिव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओमध्ये विक्रांत म्हणतो, “माझं सध्या वय ३७ आहे, मी वयाच्या २० ते २१ वर्षाचा असल्यापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी जेव्हा १७ वर्षांचा होतो, तेव्हापासूनच वडिलांचं शरीर थकू लागलं होतं. वयोमानामुळे त्याचं शरीर दुखायचं. एकाबाजूला वडिलांचं शरीर दुखत होतं तर दुसरीकडे, जबाबदारी वाढत होती.”
“तेव्हाच मी विचार केला, आता आपल्या घराची जबाबदारी आपणंच उचलायला हवी. मी आणि आमचं कुटुंब एका छोट्या रुममध्ये राहत होतं. एक दिवशी वडील मला जेवण झाल्यानंतर सहज फिरायला घेऊन गेले. त्या दिवशी वडील आणि मी आम्ही दोघंही मोकळेपणाने बोललो. तेव्हा मला जाण झाली की, आता आपण आपल्या वडिलांना घरखर्चाला हातभार लावण्याची वेळ आली आहे. तेव्हापासून मी सुद्धा माझ्या वडिलांना घर खर्चाला मदत करत आहे.”
यानंतर विक्रांत आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्याकडे बोट करत म्हणाला, “मी ज्या संघर्षाचा सामना केला आहे, तोच संघर्ष मनोज सरांनीही त्यांच्या आयुष्यात केला आहे. जेव्हा मी मनोज सरांची कथा ऐकली तेव्हा मला ती इतकी खास वाटली की मी माझ्या पद्धतीने ती सर्वांसमोर आणण्याचे ठरवले.” यावर अमिताभ बच्चन यांनी टाळ्या वाजवत आयपीएस मनोज कुमार शर्मा आणि अभिनेता विक्रांतचं कौतुक केलं. 12th Fail चित्रपटात मनोज कुमार शर्मा यांची कथा आहे.
विक्रांत मेस्सीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, विक्रांत 12th Fail चित्रपटानंतर लवकरच ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विक्रांत एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या गोध्रा ट्रेन घटनेवर आधारित कथानक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केले आहे. चित्रपटात राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 15 नोव्हेंबरला देशभरात रिलीज होणार आहे.