कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. कॉमेडियनचे चाहते आणि मित्रमंडळी नाराज आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर जवळपास आठवडाभरापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते. बुधवारी शेखर सुमन यांनी सांगितले की, राजूची प्रकृती आता सुधारत आहे. यानंतर आता या कॉमेडियनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांचे जवळचे मित्र आणि कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी सांगितले की, राजूच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी बोलताना एहसान कुरेशी म्हणाले, ‘डॉक्टरांनी अद्याप हार मानली नाही. त्याला वाचवण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतील आणि आता एखादा मोठा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो, असे त्याने कुटुंबीयांना सांगितले आहे. त्याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
‘आम्ही सर्व मित्र प्रार्थना करत आहोत आणि मागे कधीतरी हनुमान चालिसाचा जप केला होता’, असेही तो म्हणाला.’द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’दरम्यान राजू श्रीवास्तव आणि एहसान कुरेशी एकमेकांना भेटले होते. तेव्हापासून ते दोघे खूप जवळचे मित्र आहेत.अलिकडेच कॉमेडियन राजपाल यादवनेही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, राजू बरा झाल्यानंतर त्याला भेटण्याची तो आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्याने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, ‘राजू, माझा भाऊ लवकर बरा हो…’ असे सांगत राजपालने आपल्या भावना व्यक्त केल्या.