Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरेपूर मनोरंजन करणारा "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 04, 2024 | 07:38 PM
पुरेपूर मनोरंजन करणारा “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

पुरेपूर मनोरंजन करणारा “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us
Close
Follow Us:

Navra Maza Navsacha 2 Trailer : “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाच्या टीजरमुळे चित्रपटाविषयी खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता वाढवणारा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – फरहान अख्तरच्या 120 Bahadur ची पहिली झलक, दिसणार भारतीय सैन्याच्या भूमिकेत

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे,गणेश पवार अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून भेटीस येणार आहे. त्याशिवाय हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते लिलीपुट या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅमेरामन म्हणून पराग देशमुख आणि नितीनचंद्र बांदेकर यांनी काम पाहिले आहे. वैभव जोशी, प्रवीण दवणे, अवधूत गुप्ते, संतोष पवार यांनी लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते, जितेंद्र कुलकर्णी, रविराज कोलथरकर यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, सचिन पिळगांवकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभु अरोरा, विभावरी जोशी, सिद्धार्थ जाधव यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. दीपाली विचारे, सॅड्रिक डिसोझा, अजिंक्य शिंदे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

“नवरा माझा नवसाचा 2” का तर पहिल्या भागात एक जोडपे होते या भागात दोन जोडपी आहेत, डबल धमाका, मनोरंजन या चित्रपटात अनुभवता येणार आहे तसेच गणपती बाप्पाचा डबल आशिर्वाद आहे. या चित्रपटात भक्ति, श्रद्धा या दोघी असून अर्थात भक्ति माझी बायको असून श्रद्धा माझी मुलगी आहे आणि या दोघींची गणपती बाप्पावर खुप भक्ति आणि श्रद्धा आहे. मनोरंजनासोबतच या चित्रपटात एक लव्हस्टोरी पण आहे. मला वाटत की खुप कालावधीनंतर फॅमिलीसोबत पाहण्यासारखा चित्रपट येतोय तेव्हा तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पहा असे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी सांगितले.

हे देखील वाचा – ‘आपलं गावच बरं गड्या’, परदेशातून थेट गावात ‘झिम्मा २’ नंतर हेमंत ढोमेचं पुढचं पाऊल

“नवरा माझा नवसाचा 2” मध्ये स्वप्नील जोशी-हेमल इंगळे ही जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांची जावई, मुलगी अशा भूमिकेत दिसणार आहे. सासऱ्यांनी ज्याप्रमाणे धडपड करून नवस फेडला, तसा आता जावयाला फेडता येतो का ? याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नवस फेडण्यासाठीच्या रेल्वे प्रवासात हिरे चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाचं कथानकही उलगडणार आहे. त्यामुळे मनोरंजक आणि थरारक अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. उत्तम गोष्ट, दमदार अभिनय, खुसखुशीत संवाद, श्रवणीय संगीत अशी मनोरंजनाची पुरेपूर मेजवानी या चित्रपटातून अनुभवायला मिळणार असून अजूनही काही सरप्राइज गोष्टी या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून त्यासाठी प्रेक्षकांना केवळ २० सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Sachin pilgaonkar supriya pilgaonkar ashok saraf swapnil joshi and siddharth jadhav starrer navara maza navsacha 2 trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 07:25 PM

Topics:  

  • Entertainement News

संबंधित बातम्या

रक्तरंजित थरार… ‘Mysaa’ साठी Rashmika Mandanna ने ओलांडल्या स्वतःच्या मर्यादा, धडकी भरवेल असा अंदाज
1

रक्तरंजित थरार… ‘Mysaa’ साठी Rashmika Mandanna ने ओलांडल्या स्वतःच्या मर्यादा, धडकी भरवेल असा अंदाज

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम
2

रहस्य, पेच आणि… दुसऱ्या आठवड्यातही Pooja Sawant च्या ‘सालबर्डी’चा थरार कायम

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?
3

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?

केम छो? ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार गुजराती कुटुंबाची सून; साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली की, आम्ही….
4

केम छो? ; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार गुजराती कुटुंबाची सून; साखरपुड्याचे फोटो शेअर करत म्हणाली की, आम्ही….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.