Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Pilgaonkar Birthday: सचिनच्या आईला आवडली सुप्रिया, मुलाच्या मागे लागली; सुप्रियाला घातली ‘अशी’ मागणी!

सचिन आणि सुप्रिया मराठी चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले आणि सचिनपूर्वी त्याच्या आईला सून म्हणून सुप्रिया आवडली होती. कसे झाले एकमेकांवर प्रेम आणि सचिनने कशी मागणी घातली नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 16, 2025 | 01:10 PM
सचिन सुप्रियाची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सचिन सुप्रियाची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुप्रिया पिळगावरचा वाढदिवस
  • सचिन आणि सुप्रियाची लव्ह स्टोरी
  • कशी जमली जोडी

बॉलिवूड, मराठी आणि टीव्हीवरील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकरदेखील एक ज्येष्ठ अभिनेत्री आहे. सुप्रिया यांनी मराठी आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्येही खूप काम केले आहे. 16 ऑगस्ट रोजी सुप्रियाचा वाढदिवस असतो. 

बॉलिवूड चित्रपटांमध्येही सुप्रियाने काम केले आहे. सचिन आणि सुप्रियाने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मुलगी श्रिया पिळगावकरसह एकदा उपस्थिती लावली होती आणि जिथे दोघांनीही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक संस्मरणीय किस्से शेअर केले. यावेळी सुप्रियाने सचिनशी कसे लग्न झाले याबाबतही सांगितले, जाणून घ्या त्यांची लव्ह स्टोरी (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम) 

सचिन – सुप्रियाची लव्ह स्टोरी

सचिन – सुप्रियाची भेट कशी झाली

सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांनी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचा टीव्ही शो ‘तू तोता तू मैना’ दूरदर्शनवर सुपरहिट ठरला. सुप्रिया आणि सचिनच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. पण त्यांच्या प्रेमकथेला कशी सुरूवात झाली माहीत आहे का?

सुप्रिया पिळगावकर यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सचिन पिळगावकर यांनी तिला प्रपोज कसे केले हे सांगितले. सुप्रिया म्हणाली की सचिनने तिला एका चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केले होते. सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. सचिनच्या आईने सचिनला तिच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या की, जेव्हा सचिन त्यांच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मराठी चित्रपटातील मुख्य अभिनेत्री शोधत होता, तेव्हा त्याच्या आईने दूरदर्शनवर तिचा अभिनय पाहिला आणि सचिनला तिला कास्ट करण्याचा सल्ला दिला.

“स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना…”, अभिनेते सचिन पिळगावकरांचे वक्तव्य चर्चेत

योग्य अभिनेत्रीच्या शोधात

मराठी चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड

सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “सचिनला हा चित्रपट बनवायचा होता, पण त्यासाठी योग्य अभिनेत्री शोधण्यासाठी तो खूप संघर्ष करत होता. म्हणून त्याने सर्वांना अभिनेत्री शोधण्याचे काम सोपवले.” सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “त्या काळात मी मुंबईतील दूरदर्शन वाहिनीवरील एका छोट्या कार्यक्रमात काम करत होते. माझ्या सासूबाई शो पाहत होत्या आणि त्यांनी मला पाहिले आणि त्यांना वाटले की मी मुख्य अभिनेत्रीसाठी योग्य आहे. तिने सचिनला माझ्याबद्दल सांगितले आणि तो त्याच्या आईशी सहमत झाला.”

आईने दिला लग्नाचा सल्ला 

आईनेच सुप्रियाला निवडले

कपिलला सुप्रिया पिळगावकरांनी सांगितले की,  “त्याने मला शो मध्ये पाहिले. या भेटीदरम्यान, त्याला कळले की मी गोव्याची आहे. माझ्या सासूबाईंनी सचिनला सल्ला दिला की मी त्याच्यासाठी एक परिपूर्ण जोडीदार आहे. सचिनच्या मनात बीज रोवले गेले होते की मी त्याची परिपूर्ण जीवनसाथी होईन.” पुढे तिने सांगितले कीॉ, “चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान काहीही झाले नाही. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर सचिनने मला प्रपोज केले. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याला ही काळजी होती की, जर मी त्याला नकार दिला तर चित्रपटाचे काय होईल. पण शुटिंग संपल्यानंतर त्याने प्रपोज केले आणि मी हो म्हटले.” 

Sachin Pilgaonkar: ‘मला कोणी काम देत नाही…’ लोकप्रिय अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केली खंत!

माहेरून आधी होता विरोध

सुप्रियाच्या माहेरून आधी होता विरोध

सुप्रिया पिळगावकर यांनी असेही सांगितले की तिचे पालक लग्नाला सहमत नव्हते. कारण त्यांना चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर विश्वास नव्हता. पण सचिनने त्यांना सांगितले की त्याने ‘नदिया की पार’ सारख्या कौटुंबिक चित्रपटातही काम केले आहे. त्यानंतरच त्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.

Web Title: Sachin supriya love story actress revealed how actor proposed her with mother consent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • sachin pilgaonkar

संबंधित बातम्या

धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
1

धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव

“काल करूरमध्ये जे काय घडले…” रॅलीमधील झालेल्या घटनेवर विजय थलापथी भावुक; शेअर केली पोस्ट
2

“काल करूरमध्ये जे काय घडले…” रॅलीमधील झालेल्या घटनेवर विजय थलापथी भावुक; शेअर केली पोस्ट

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार
3

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार

Filmfare Awards: ७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर; ‘लापता लेडीज’ ला २४ नामांकने, पाहा संपूर्ण यादी
4

Filmfare Awards: ७० व्या फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर; ‘लापता लेडीज’ ला २४ नामांकने, पाहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.