sachin pilgaonkar talked about men and women equality know what he said
स्त्री-पुरुष समानता ही केवळ तोंडी घोषणा न राहता ती आपल्या वर्तनात आणि दैनंदिन जगण्यात उतरायला हवी, असं कायमच आपल्या वाटतं. आज आपण एकविसाव्या शतकात आहोत. इतर ग्रहांवर मानव मानवीवस्ती करत असताना अजूनही आपण स्त्री-पुरुष समानतेत गुरफटलेलो आहोत. अजूनही अनेक ठिकाणी मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला जातो. अशातच आता पुन्हा एकदा स्त्री-पुरुष समानता विषय चर्चेत आला आहे. चर्चेत येण्याचा कारण म्हणजे, अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी हे वक्तव्य ‘स्थळ’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केलेलं आहे.
एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवकर म्हणाले की, “आपल्याकडे म्हणतात की, स्त्री आणि पुरुष समान आहेत. तुम्ही त्यांना समान वागवलं पाहिजे. स्त्रियांना तुम्ही खालच्या दर्जाला ठेवता आणि पुरुषांना वरचा दर्जा देता. तर तसं नाहीये. स्त्री आणि पुरुष समान आहेत, हे मी मनात नाही. कारण स्त्री ही सर्वार्थाने पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. स्त्रीचं स्थान वर आहे आणि पुरुषाचं स्थान तिच्यापेक्षा खाली आहे. आपण हे मानलं पाहिजे. परमेश्वरानेही हे सिद्ध केलं आहे. कारण आई बनण्याचं सौभाग्य त्याने फक्त आणि फक्त स्त्रीला दिलं आहे. दुसऱ्या कुणाला दिलेलं नाही. यातून हे सिद्ध होतं की, स्त्री ही श्रेष्ठ आहे आणि ते लोकांनीही मानलं पाहिजे.”
Zapuk Zupuk Teaser: गोलीगत सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा अफलातून टीझर रिलीज, स्टाईलने वेधलं लक्ष
यापुढे त्यांनी म्हटलं की, “बरं पुरुषाला हे माहित नव्हतं अशातला भाग नाही. पुरुषाला हे सर्व माहिती होतं. खूप पुर्वीपासून माहिती होतं. त्याला कळलं की, ही आपल्या पेक्षा खूप शक्तिशाली आहे. म्हणून त्याने काय केलं. तिला घरी बसवलं. मुलं सांभाळा, जेवण करा, घरची साफसफाई करा ही कामे तिला दिली. बाकीची बाहेरची कामे मी पाहीन. बाकी दुनियेत तो जाणार पण तिने घराच्या बाहेर पडायचं नाही. कारण ती घराबाहेर पडली तर तिला नवीन संधी मिळणार. तिला शिकता येणार, तिला योग्य-अयोग्य समजणार आणि तिला जर समजलं तर ती पुरुषावर वर्चस्व करणार.”
यापुढे अभिनेत्याने म्हटलं की, “या सगळ्या प्रथा त्यामुळेच सुरू झाल्या की, मुलीने शिकून करायचं काय? शेवटी लग्नच तर करायचं आहे. पोरंबाळं तर सांभाळायची आहेत. धुणीभांडी तर करायची आहेत. हेच काम आहे बाईचं… दूसरं काय काम आहे? लाज नाही वाटत. तुम्ही असं स्त्रियांना वागवता. त्यामुळे मी याच्या विरुद्ध आहे.” दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्याशी अनेक चाहत्यांनीही संमती दर्शवली आहे.