Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानच्या Battle of Galwan चा मोशन पोस्टर प्रदर्शित, भारताच्या सर्वात मोठ्या क्रूर युद्धाची स्टोरी रूपेरी पडद्यावर

सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच रोमँटिक हिरो आणि दमदार ॲक्शन करणारा भाईजान आता एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 04, 2025 | 09:16 PM
सलमान खानच्या Battle of Galwan चा मोशन पोस्टर प्रदर्शित, भारताच्या सर्वात मोठ्या क्रूर युद्धाची स्टोरी रूपेरी पडद्यावर

सलमान खानच्या Battle of Galwan चा मोशन पोस्टर प्रदर्शित, भारताच्या सर्वात मोठ्या क्रूर युद्धाची स्टोरी रूपेरी पडद्यावर

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला विशेष ओळखीची गरज नाही. कायमच बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई करणाऱ्या भाईजानच्या चित्रपटांना सध्या अच्छे दिन पाहायला मिळत नाहीये. ‘किसी का भाई और किसी की जान’ आणि ‘सिकंदर’ हे दोन्हीही चित्रपट सलमान खानचे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. गेल्या काही वर्षांपासून भाईजान आपली जादू दाखवण्यासाठी काही अंशी अपयशी होताना दिसत आहे. सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच रोमँटिक हिरो आणि दमदार ॲक्शन करणारा भाईजान आता एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे.

सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? अभिनेत्रीने शेअर केले पती झहीर इक्बालबरोबरचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स; प्रेग्नेंसीबद्दल म्हणाली…

बॉलिवूडचा सुपरस्टार आता लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच सलमान खानच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. सलमान आता लवकरच गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याच्या ह्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan)चा मोशन पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे.

“उपाध्येंचा ‘राशीयोग’ बरा नव्हता…”; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केलेला आहे. या शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सलमान खानचा रक्ताने माखलेला चेहरा, रुबाबदार मिशी आणि डोळ्यात देशभक्तीच्या ज्वाला बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या मूळ संकल्पनेवर प्रकाश टाकत, हे पोस्टर भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर पण गोळ्या न झाडता लढल्या गेलेल्या युद्धाची कहाणी सांगते. १५,००० फूट उंचीवर लडाखच्या गलवान खोऱ्यात घडलेला हा संघर्ष भारताच्या अदम्य साहसाचे प्रतीक ठरला आहे.

 

‘बॅटल ऑफ गलवान’ ही कहाणी आहे १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात भारतीय व चीनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाची. हे युद्ध पारंपरिक शस्त्रांऐवजी दगड, लाकडी काठ्या आणि हातांनी लढले गेले होते. कारण त्या भागात बंदुका वापरण्यावर बंदी होती. या संघर्षात दोन्ही देशांच्या अनेक जवानांनी आपले प्राण गमवावे लागले. या संघर्षात सीमेवर मृत्यूची नोंद झाली.

मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी कोणी पसरवली? पोस्ट शेअर करत रेशम टिपणीस संतापली

सलमान खान याच्या नव्या रूपात पाहणे हा अनुभव निश्चितच आगळा-वेगळा ठरणार आहे. भारताच्या वीर जवानांच्या बलिदानाची ही गाथा प्रत्येक भारतीयाने पाहिलीच पाहिजे, अशी भावना या मोशन पोस्टरमधून उमटते. ‘बॅटल ऑफ गलवान’ – एक असा चित्रपट, जो केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेरणा देणारी वास्तव कहाणीही ठरणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Salman khan officially announces his next movie titled battle of galwan directed by apoorva lakhia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Salman Khan
  • salman khan news

संबंधित बातम्या

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल
1

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश
2

‘सारे जहां से अच्छा’ गात Salman Khan ने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, व्हिडिओ पाहून चाहते झाले खुश

Independence Day: स्वातंत्र्य दिनी धमाका! १५ ऑगस्ट ‘या’ देशभक्ती गीतांनी करा साजरी, सैनिकांच्या बलिदानाला करा सलाम
3

Independence Day: स्वातंत्र्य दिनी धमाका! १५ ऑगस्ट ‘या’ देशभक्ती गीतांनी करा साजरी, सैनिकांच्या बलिदानाला करा सलाम

Coolie Movie Download: रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका
4

Coolie Movie Download: रजनीकांतचा ‘कुली’ रिलीज होताच ऑनलाइन लीक, पायरसीमुळे निर्मात्यांना मोठा फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.