Sonakshi sinha reacts to pregnancy rumors with zaheer
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक आहे. सोनाक्षी सिन्हाने गेल्या वर्षी अर्थात जून २०२४ मध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न उरकलं. अभिनेत्रीने लग्न उरकल्यानंतर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिलीये. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा रंगलीये की, सोनाक्षी आणि झहीर यांच्याकडे गुडन्यूज आहे. सोनाक्षी प्रेग्नंट आहे आणि लवकरच ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करतील, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यावर सोनाक्षीनं अतिशय स्मार्ट आणि विनोदी अंदाजात उत्तर दिलंय.
“उपाध्येंचा ‘राशीयोग’ बरा नव्हता…”; मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, निलेश साबळेबद्दल म्हणाले…
कायमच अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी सोनाक्षी सिन्हा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अनेकदा अभिनेत्री इन्स्टाग्रामवर तिचा नवरा झहीर इक्बालसोबत गंमतीशीर व्हिडिओ आणि फोटोज् शेअर करत असते. आता अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांवर संभाषणामध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ही दिलेली मजेशीर प्रतिक्रिया अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे.
मुलाच्या मृत्यूची खोटी बातमी कोणी पसरवली? पोस्ट शेअर करत रेशम टिपणीस संतापली
सोनाक्षीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर झहीर सोबतच्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. त्या चॅटमध्ये दिसतंय की झहीर तिला विचारतो, “भूक लागलीये का?” त्यावर सोनाक्षी उत्तर देते, “भूक नाही आहे. जबरदस्तीने खाऊ घालणं बंद कर.” पुढे झहीर म्हणतो, “मला वाटलं सुट्ट्या सुरू झाल्या आहेत.” त्यावर सोनाक्षी म्हणते, “मी आताच तुझ्यासमोर जेवण केलं आहे. आता नको आहे मला काही.” या संवादाच्या अखेरीस झहीर तिला “I love you” म्हणतो. त्यावर सोनाक्षी “I love you more” असं उत्तर देते. सोनाक्षीनं या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं, “यामुळेच लोकांना वाटतं की मी प्रेग्नंट आहे, असं वागणं बंद कर झहीर.” तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांचा गैरसमज दूर झाला आहे. प्रेग्नेंसीच्या अफवांना खोडून काढणं हा सोनाक्षीचा चॅट शेअर करण्यामागचा हेतू होता.
Sonakshi sinha reacts to pregnancy rumors with zaheer
खासगी चॅटिंगचा स्क्रिनशॉट अभिनेत्रीने झहीरला टॅग केला आहे. कायमच सोनाक्षी आणि झहीरमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे क्षुल्लक वाद होताना आपण इन्स्टा स्टोरी वैगेरेच्या माध्यमातून पाहत असतो. सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल बोलायचं तर, अलीकडेच, सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असलेली ‘निकिता रॉय’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्रीच्या भाऊ आणि लोकप्रिय अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश सिन्हा याने हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे.