अभिनेत्री सान्या मल्होत्रासाठी 2024 हे वर्ष महत्त्वाचे ठरले आहे आणि तिला ‘कठल ‘ मधील तिच्या अभिनयासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार देखील देण्यात आले आहे. आणि ती तिच्या आगामी ‘मिसेस’ चित्रपटाने जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये चमक दाखवली आहे. ‘मिसेस’ मधील तिच्या दमदार अभिनयासाठी प्रतिष्ठित न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठी तिला नामांकन मिळालं असून सान्या साठी हि गोष्ट नक्कीच खास ठरली आहे.
राजश्री देशपांडे, प्रियांका बोस आणि तनिष्ठा चॅटर्जी यांसारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित प्रतिभांसह सान्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ ची श्रेणी शेअर करणार आहे. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ श्रेणीत, अमिताभ बच्चन, रोशन मॅथ्यू आणि इतरांना आपापल्या परफॉर्मन्ससाठी नामांकन मिळाले होते. फक्त सान्यालाच नाही तर या चित्रपटाची दिग्दर्शिका आरती कडव हिने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या श्रेणीत नामांकन मिळवले आहे.
ही ओळख तिच्या भरभराटीच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. ज्यामुळे तिचा जागतिक स्टार म्हणून दर्जा मजबूत झाला आहे. ‘मिसेस’ हे स्त्रीत्व, नातेसंबंध आणि सामाजिक अपेक्षा यांच्या गुंतागुंतीचा शोध घेणारा हा चित्रपट आहे. चित्रपटातील सान्या मल्होत्राच्या भूमिकेने अभिनेत्रीची सर्वत्र प्रशंसा केली आहे. सान्या मल्होत्राचे आंतरराष्ट्रीय नामांकन केवळ तिची अष्टपैलुत्व आणि वचनबद्धता अधोरेखित करत नाही तर ती उत्तम अभिनेत्री देखील आहे असे दाखवून दिले.
[read_also content=”ऐश्वर्या, सलमान, शाहरूखला टाकले मागे, दीपिका पादुकोण जगभरात ठरली अव्वल! https://www.navarashtra.com/entertainment/deepika-padukone-tops-in-imdb-list-most-viewed-indian-star-of-the-last-decade-see-the-list-540101/”]
सान्याने आताच जवान या चित्रपटात सहाय्यक भूमिका करताना दिसली होती. तसेच ती सॅम बहादूर, कथाल, बदाई हो, मीनाक्षी सूरदेश्वर आणि दंगल असे अनेक हिंदी चित्रपटात काम करून नेहमीच चर्चेत राहिली आहे. याचदरम्यान सान्या कामाच्या आघाडीवर, ‘मिसेस’ व्यतिरिक्त अनेक प्रकल्प प्रेक्षकांसमोर येणार आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’मध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि रोहित सराफ देखील दिसणार आहेत.