झी मराठीवरील, सा रे ग म प लिटील चॅम्प्समधून घराघरात पोहोचलेला लिटिल मॉनिटरचा आवाज म्हणजे मुग्धा वैशंपायन. या गोड गळ्याच्या गायिकेने आपल्या सुरांनी प्रेक्षकांना कायमच मंत्रमुग्ध केलं आहे. आपल्या गाण्याबाबात किंवा वैयक्तिक आयुष्यबाबातही मुग्धा सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतेच. नुकतीच तिने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुग्धाने तिच्या वडिलांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट लिहिली आहे.
मुग्धा म्हणतेय की, Wishing my hero, my strongest pillar, my strength, my idol, my inspiration in everything I do, happiest 60th birthday!
Unfortunately बाबांबद्दल व्यक्त आपण फार कमी वेळा होतो.. आज त्यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने थोडं लिहिते.खूप लहानपणापासून बाबांनी मला माझ्या नकळतपणे चांगलं गाणं ऐकवलं.एक स्टँडर्ड सेट करून दिलं.पंडित रामभाऊ मराठे, पंडित गजाननबुवा जोशी, पंडित अभिषेकी बुवा, लता दीदी, आशा बाई अशा अनेक दिग्गजांची गाणी बाबा घरी सतत लावून ठेवायचे. त्यानंतर सारेगमप मध्ये त्यांचं ऑफिस सांभाळून माझी गाणी बसवून घेण्यापासून ते माझे केस सेट करुन देण्यापर्यंत सगळं केलंय बाबांनी.माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झाल्यावर तिलवाडा झुमरा तालांचे संस्कार माझ्यावर व्हावे म्हणून बाबा ताल मशिन वर ते ठेके मला घरी नुसते ऐकवायचे.10 वी नंतर बाबा ज्या कॉलेजात शिकले त्याच माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजमध्ये मी शिकले आणि “मुंबईचं जग” बाबांनी दाखवलं.बाबा कायम म्हणतात. “आपल्याकडे कला थोडी कमी असली तरी चालेल, पण ‘माणूस’ म्हणून आपण परिपूर्णच असायला हवं ” बाबांशिवाय हे सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं?
Lucky to have you in my life
Love youuuu, Babaaa अशा शब्दात वडिलांच्य़ा 60 व्या वाढदिवासानिमित्ताने मुग्धाने तिच्या वडिलांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
मुग्धाने वडिलांबरोबरचे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मुग्धाच्या करियबाबत सांगायचं झालं तर अलिबागसारख्या गावातून येत तिने आपल्या गोड गळ्य़ाने चाहत्यांना वेड लावलं. मुग्धा गायक प्रथमेश लघाटे याच्याशी काही वर्षापूर्वीच विवाह बंधनात अडकली. प्रथमेश आणि मुग्धाच्या जोडीदार सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळते.






