‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडीओची (Zee Studios) निर्मिती असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असणार आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका असल्याचं समोर आलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांची भूमिका सायली संजीव साकारणार आहे. सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटातील तिच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर केले आहे. सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.
[read_also content=”चिखली हत्येप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर https://www.navarashtra.com/maharashtra/bail-to-accused-of-chikhali-murder-case-nrsr-333969/”]
‘हर हर महादेव’ चित्रपटातील महाराणी सईबाईंच्या लूकमधील पोस्टर शेअर करत सायलीने “मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी महाराणी सईबाई भोसले. त्यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव”, असं म्हटलं आहे.