डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून एक नगराध्यक्षपदासह 25 नगरसेवक जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांच्यासह भाजपचे आमदार हरिचंद्र भोये देखील उपस्थित होते. पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्ष एकवटले असले तरी याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नसून आम्ही केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्या पाठीशी राहील असा विश्वास यावेळी भाजपचे डहाणू नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत राजपूत आणि खासदार हेमंत सावरा यांनी व्यक्त केला.