सिंधी समाजावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ उल्हासनगर शहरात गुरुवारी सिंधी एकता पत्रकार मंचाच्या वतीने ऐतिहासिक आक्रोश रॅली काढण्यात आली. या रॅलीत सिंधी समाजासह विविध समाजघटक आणि संघटनांनी एकजुटीने सहभाग नोंदवत प्रचंड प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून संतप्त भावना व्यक्त केल्या. ही भव्य रॅली उल्हासनगर कॅम्प १ येथील गोल मैदानातून सायंकाळी ४ वाजता सुरुवात झाली आणि उल्हासनगर कॅम्प २ मधील भाऊ परसराम झूलेलाल मंदिर येथे सायंकाळी ७ वाजता समारोप झाला. रॅलीदरम्यान “अमित बघेल मुर्दाबाद”च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच बघेलचा पुतळा फुंकून व त्याच्या छायाचित्रांवर जोडे-चप्पलांनी प्रहार करून सिंधी समाजाने आपला संताप व्यक्त केला. या आक्रोश रॅलीत सिंधी समाजाचे संत-महात्मे, विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी, तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. रॅलीतून सिंधी समाजाने एकतेचा आणि आत्मसन्मानाचा ठाम संदेश दिला. सिंधी एकता पत्रकार मंचाने या आंदोलनाचे नेतृत्व केले असून, “जर कोणी सिंधी समाजाच्या विरोधात वक्तव्य करेल किंवा अपमान करेल, तर समाज एकजुटीने त्याला उत्तर देईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.