मंदार महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल; अभिनेत्री स्वरांगी मराठे यांची उपस्थिती
मंदार शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. राजाराम शिंदे यांच्या आशीर्वादाने आयोजित ‘मंदार महोत्सव २०२५’ नुकताच रामवरदायिनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रताप शिंदे आणि मंदार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मंदार शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या महोत्सवात क्रीडा स्पर्धा, विशेष दिनोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली. मंदार शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
क्रीडा विभागात बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, रांगोळी स्पर्धा, धावण्याच्या शर्यती यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. खेळाडूंनी चांगली कामगिरी करत आपली प्रतिभा सिद्ध केली. बॉलीवूड डे आणि ट्विनिंग डे उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून या दिवसांचे वैशिष्ट्य ठळक केले. सांस्कृतिक विभागात नृत्य, नाट्य आणि गायनाच्या कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘मोबाईलच्या दुष्परिणामां’वर प्रभावी नाट्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. फार्मसी महाविद्यालयाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रभावी नाट्य सादर केले. पॉलिटेक्निक महाविद्यालयाने महाभारतातील श्रीकृष्णाच्या भूमिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. वरिष्ठ महाविद्यालयाने महाराष्ट्रातील विविध सणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना भारावून टाकले.
गोविंदा- सुनीता अहुजाचा घटस्फोट होणार ? अभिनेत्याच्या वकिलाने सर्व काही सांगून दिले
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पमुख पाहुण्या अभिनेत्री स्वरांगी मराठे होत्या. एकूणा ‘मंदार महोत्सव २०२५’ हा केवळ मनोरंजनाचा नाही तर विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. संस्थेच्या सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचायांनी परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वी केला. संस्थेच्या अध्यक्ष मंदार शिंदे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत भविष्यातही असेच कार्यक्रम होत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.