फोटो सौजन्य: सोशल मीडिया
शाहरुख खानचा सगळ्यात लहान मुलगा अबराम खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. त्याचे क्यूट व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच अबरामचा शाळेतल्या गॅदरिंगमधला व्हिडिओ व्हायरल झाला होता. अबरामने ऐश्वर्या- अभिषेकची मुलगी आराध्यासोबत स्टेजवर परफॉर्म केला होतं.
दरम्यान, आता अबरामचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये, अबरामचे आणखी एक टॅलेंट चाहत्यांना पाहयला मिळत आहे. सध्या अबरामची एक्सवर (ट्वीटर) व्हायरल होणारी व्हिडिओ चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये शाळेतील इव्हेंटमध्ये अबराम गिटार वाजवत असल्याचं दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याचे चांगलंच कौतुक करीत आहेत.
गोविंदा- सुनीता अहुजाचा घटस्फोट होणार ? अभिनेत्याच्या वकिलाने सर्व काही सांगून दिले
अभिनयातही माहीर असलेला अबराम किती चांगला अभिनय करतो, हे अनेकदा आपल्याला त्याच्या शाळेच्या गॅदरिंगमधून कळले आहे. पण सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतून अबराम किती उत्तम गिटार वाजवतो, याचा प्रत्यय आला आहे. त्याचा गिटार वाजवतानाचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटींसह शाहरुख खानचे चाहतेही आश्चर्य झालं आहे. ११ वर्षांच्या अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात तो गिटार वाजवतोय आणि त्यासोबत गाणं गाताना दिसतोय. व्हिडिओ पाहून तो शाळेतल्या एका कार्यक्रमातच गात आहे की काय ? असं वाटतंय.
AbRam Khan singing “Die with a smile” @iamsrk pic.twitter.com/oAyESfsWHY
— Nidhi (@SrkianNidhiii) February 25, 2025
“तुझा इतिहास खरा की माझा?”, सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत…
गिटार वाजत अबराम हा लोकप्रिय अमेरिकन गायिका लेडी गागा आणि ब्रूनो मार्सचं ग्रॅमी विनिंग गाणं Die With A Smile गाताना दिसतोय. त्याचा व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहे. व्हिडीओत अबरामने काळ्या रंगाची जर्सी आणि शॉर्ट्स परिधान केली असून तो खूर्चीवर बसला आहे. अबरामचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. अबरामनं गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या डिज्नीच्या ‘मुफासा: द लायन किंग’ चित्रपटाच्या हिंदी डब्ड चित्रपटाला आवाज दिला आहे.