govinda wife sunita ahuja reacts to trolls over her divorce rumors
कालपासून सोशल मीडियावर ९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे. कायमच आपल्या अभिनयाने, कॉमेडीने आणि दमदार डान्स शैलीने प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलंय. लग्नाच्या ३७ वर्षांनंतर आता अभिनेता घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांवर अखेर गोविंदाने मौन सोडले आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याच्या घटस्फोटाचे प्रमुख कारण, गोविंदाचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात आता गोविंदाने अखेर मौन सोडले आहे.
“तुझा इतिहास खरा की माझा?”, सद्य परिस्थितीवर मराठमोळ्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत…
घटस्फोटाच्या चर्चांनंतर अद्याप गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण आता गोविंदाचे वकील आणि फॅमिली फ्रेंड ललित बिंदल यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, “गोविंदाची पत्नी सुनिताने सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र आता त्यांच्यातील गोष्टी आपोआप सुधारताना दिसत आहेत. आता ते दोघंही पुन्हासोबत आले आहेत आणि त्यांच्यातील नातं आणखी घट्ट होताना दिसत आहे. आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने नेपाळला गेलो होतो. तिथल्या पशुपतिनाथ मंदिरात पूजा केली. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. विवाहित जोडप्यांमध्ये कायमच या गोष्टीची चर्चा होत असते, पण त्यांच्यातील नाते मजबूत असते. नेहमीच ते एकत्र राहतील.”
ललित बिंदल यांनी गोविंदा आणि त्याची पत्नी वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहतात, याचीही त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “गोविंदाने खासदार झाल्यानंतर त्याच्या अधिकृत वापरासाठी हा बंगला खरेदी केला होता आणि तो लग्नापासून ज्या फ्लॅटमध्ये राहत आहे त्याच्या अगदी समोर आहे. त्या बंगल्यात गोविंदाच्या काही मिटिंग्सही असतात, तर कधी तो त्या बंगल्यात झोपतोही. पण, गोविंदा आणि सुनीताचे वैवाहिक जीवन चांगले आहे. तो आणि सुनीता एकत्र राहतात.”
‘त्याच्यासोबत काय घडतंय काय माहित…’ तन्मय भट्टने रणवीर अलाहबादियावर केली मिश्किल टीप्पणी
सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांबद्दल वकिलाने सांगितले की, सुनीता आहुजा यांनी पॉडकास्टमध्ये आणि काही ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी सोयीस्करपणे गोष्टी उचलले जात आहेत आणि हे दोघांविरुद्ध वापरले जात आहेत. ती म्हणाली होती, ‘मला गोविंदासारखा नवरा नको आहे’. यासोबतच तिने असेही म्हटले होते की, तिला गोविंदासारखा मुलगा हवा आहे आणि जेव्हा ती म्हणाला की, ‘गोविंदा त्याच्या व्हॅलेंटाईनसोबत आहे’, तेव्हा ती पुढे म्हणाली की, त्याचे कामच गोविंदाचे व्हॅलेंटाईन आहे. वकील म्हणाले, ‘दुर्दैवाने लोक फक्त नकारात्मक गोष्टी बोलत आहेत. मी हमी देतो की दोघेही एकत्र राहतील. घटस्फोट होणार नाही.’