फोटो सौजन्य - Social Media
अभिनेता शशांक केतकर त्याच्या सोशल मीडिया हँडलवर जास्तच सक्रिय असतो. फक्त मनोरंजन पोस्ट करत नसून अनेकदा सोशल मीडियावर त्याचे सोशल विचारही मांडत असतो. आपल्या परिसरात काय सुरु आहे? काय घडलं पाहिजे? याची जाणीव तो त्याच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून नेहमीच त्याच्या चाहत्यांना तसेच इतर सिनेचाहत्यांना करून देत असतो. दरम्यान, त्याने फार महत्वाच्या प्रश्नांची देशाच्या सरकारला जाणीव करून दिली आहे.
नुकतेच… भारतात टेस्ला या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे स्वागत करण्यात आले होते. मुंबईच्या BKC मध्ये टेस्लाने त्यांची भारतातील पहिली शाखा खुली केली होती. यानंतर, देशातील ठिकठिकाणाहून टेस्लाच्या गाडीसाठी मागणी वाढली. दरम्यान, शशांकने त्याच्या सोशल मीडिया पेजवर इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून याच संबंधित पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकारला खराब रस्त्यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
पोस्ट करण्यात आलेल्या स्टोरीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की,”भारतात असताना भारतीयांसारखे कार्य करा. @teslamotors, तुमचे भारतात जाहीर स्वागत आहे.” या पुढे खराब रस्त्यांची जाणीव करून देत त्याने शासनाला टोमणा मारत लिहले आहे की,”गंमत याची वाटते tesla आणलीत! आता चांगले रस्ते? शिस्त? ते केव्हा आणाल?”
शशांकची ही इन्स्टा पोस्ट त्याच्या चाहत्यांना फारच आवडली असून यावर सरकारने लक्ष देण्याचे आवाहन संपूर्ण जनतेकडून करण्यात येत आहे. Tesla सारख्या सुपर कारसाठी तसे रस्ते असणेही फार आवश्यक आहे. भारतात मोठं-मोठ्या नॅशनल हायवेची दुर्दशा अद्याप कायम आहे. काही ठिकाणी रस्त्याची कामे जरी होत असली तरी त्याला लागणार वेळ, त्यामुळे होणारे ट्राफिक जाम, पडणारे मोठं-मोठे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेत शासनाने त्यावर काम करावे, अशी अशा संपूर्ण जनतेकडून नेहमीच वर्तवरली जाते. शशांकनेही त्याच्या या पोस्टद्वारे लवकरात लवकर अशा रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी, असा एक संदेश दिला आहे.