(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘कौन दिसा में लेके चला रे’, ‘बडे अच्छे लगते हैं’ ही सुंदर गाणी ऐकली की आठवण येते ती म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर यांची. सचिन पिळगांवकर हे नाव एक नाव नाही तर मराठी चित्रपटसृष्टीतीची एक ओळख आहे. त्यांचे चित्रपट, नाटक आणि मालिका या सगळ्यामुळे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन झालं आहे. तसेच सचिन पिळगांवकर यांनी बालवयातच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आणि आता हे नाव इतकं आजरामर झालं आहे की चाहते त्यांचे नावं स्वप्नात देखील घेऊ शकतात. आज १७ ऑगस्ट रोजी सचिन पिळगांवकर त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आणि याच खास निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेणार आहोत.
सचिन पिळगांवकर त्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्याची दोन्ही चित्रपटसृष्टीतील कारकीर्द मोठी आहे. सचिन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शरद पिळगांवकर एक चित्रपट निर्माते होते. वडिलांकडून अभिनयाचे धडे घेते सचिन यांनी अगदी बालवयातच बाल कलाकार म्हणून कामाला सुरुवात केली.
Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
१९८२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नदिया के पार’ हा चित्रपट सचिन सचिन पिळगांवकरांच्या करिअरमधील पहिला चित्रपट होता. आणि या चित्रपटाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटाची भाषा भोजपुरी होती, तरीही तो देशभरात खूप गाजला. याच चित्रपटाचा नंतर ‘हम आपके है कौन’ या नावाने हिंदी रिमेक बनवण्यात आला. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सचिन पिळगांवकर यांनी प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली. ‘गीत गाता चल’, ‘अखियों के झरोखों से’, ‘बालिका वधू’, ‘सत्ते पे सत्ता’ यांसारख्या अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. आणि प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी एक खूप खास किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, “जेव्हा मी ५ वर्षांचा होतो, तेव्हा मला अभिनयासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.” त्याच कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील उपस्थित होते. नेहरू यांनी आपल्या सदऱ्यावर लावलेलं लाल गुलाब काढून सचिनला दिलं आणि पुढेही असंच उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. असे अभिनेत्याने म्हटले आहे.
प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
सचिन पिळगांवकर यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या काही प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये ‘मै बाप’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, आणि ‘नवरा माझा नवसाचा’ यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपट नाटकात काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
सचिन पिळगांवकर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरांशी लग्न केले. श्रिया पिळगांवकर ही त्यांची मुलगी आहे. सुप्रिया पिळगांवकर या एक अभिनेत्री देखील आहेत. त्यांनी देखील अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले. त्यांचे जास्त चित्रपट हे सचिन पिळगांवकर यांच्यासोबत असल्यामुळे त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. आणि या दोघांचे पुढे लग्न झाल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला. त्यांची मुलगी श्रियानेही ‘मिर्झापूर’ सारख्या वेब सिरीजमध्ये काम करून आपली खास ओळख निर्माण केली आहे. आणि आता ती नवनवीन प्रोजेक्ट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.