Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथमेश परब, संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे करणार रोड ट्रीपचा ‘श्री गणेशा’, भन्नाट पोस्टर रिलीज

प्रथमेश परब, संजय नार्वेकर आणि शशांक शेंडे स्टारर हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या 'श्री गणेशा' चा पोस्टर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 12, 2024 | 02:13 PM
प्रथमेश परब आणि शशांक शेंडे करणार हास्य-विनोदाचा कल्ला, 'श्री गणेशा' मध्ये दिसणार धमाल रोड ट्रिपची कमाल

प्रथमेश परब आणि शशांक शेंडे करणार हास्य-विनोदाचा कल्ला, 'श्री गणेशा' मध्ये दिसणार धमाल रोड ट्रिपची कमाल

Follow Us
Close
Follow Us:

‘येड्यांची जत्रा’ तसेच ‘टकाटक’सारखे सुपरडुपर हिट चित्रपट बनवणारे मिलिंद झुंबर कवडे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आले आहेत. निर्माते संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांची निर्मिती असलेल्या तसेच मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या आगामी चित्रपटाची घोषणा मोशन पोस्टर प्रदर्शित करून करण्यात आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची मांदियाळी आणि त्यांची धमाल ‘श्री गणेशा’ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची जणू झलकच मोशन पोस्टरवर पाहायला मिळते. २० डिसेंबरला सर्वत्र रिलीज होणाऱ्या ‘श्री गणेशा’ या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना एक रोड ट्रीप चा परिपूर्ण फॅमिली एन्टरटेनर पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचा – बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी संबंधित असलेल्या कारणावरून करण्यात आली हत्या, शूटरने केला खुलासा!

एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेला ‘श्री गणेशा’ हा चित्रपट म्हणजे एक धमाल रोड मुव्ही आहे. हास्य-विनोद, धमाल-मस्ती, नाट्यमय घडामोडी, रोमान्स आणि इमोशन्सची रोलर कोस्टर राईड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरवर सुरुवातीला हिरवा साज लेऊन नटलेल्या निसर्गामधून जाणारा रस्ता आणि वर निरभ्र-निळं आकाश आहे.

काळ्याकुट्ट डांबरी रस्त्यावर एक लाल रंगाची कार आहे. कारच्या पुढील बाजूला उजव्या बाजूला कुर्ता-पायजमा घातलेला, पिकलेली पण स्टायलिश दाढी-मिशी असलेला संजय नार्वेकर डावा हात बोनेटवर टेकून उभा आहे. डाव्या बाजूला आजवर कधीही न दिसलेल्या गेटअपमध्ये शशांक शेंडे उजवा हात बोनेटवर टेकून उभे आहेत. नेहमी वाढलेल्या दाढी-मिशीत दिसणाऱ्या शशांक यांचा या चित्रपटात क्लीन शेव्ह लुक रसिकांना नक्कीच आवडेल.

कारच्या बोनेटवर बसलेला प्रथमेश परब आपल्या हटके लुकमुळे लक्ष वेधून घेतो. त्याच्या शेजारी चित्रपटाची नायिका मेघा शिंदे बसलेली आहे. हा चित्रपट म्हणजे धमाल रोड ट्रीपचा ‘श्री गणेशा’च असल्याचं सांगत मोशन पोस्टरवर शेवटी शीर्षक येतं. पोस्टरच्या तळाशी हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.

 

प्रथमेशने आजवर नेहमीच विविधांगी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याचा हा चित्रपटही वेगळ्या वाटेने जाणारा आहे. कायम लांबलचक केसांमध्ये दिसणाऱ्या प्रथमेशची बदललेली हेअर स्टाईल मोशन पोस्टरवर दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश आणि मिलिंद कवडे यांचं रियुनियन झालं आहे. ‘टकाटक’सारखा धमाल ब्लॅाकबस्टर देणारी ही जोडी पुन्हा एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाल्याचं मोशन पोस्टर पाहिल्यावर जाणवतं. टिपटॅाप शर्ट-पँट आणि विंचरलेले केस असा शशांक शेंडे यांचा लुकही रसिकांना नक्कीच आकर्षित करेल. बऱ्याचदा भाईगिरी करणारा संजय नार्वेकर या चित्रपटात काहीशा सोज्वळ भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत मोशन पोस्टरवरून मिळतात. थोडक्यात काय तर मिलिंद कवडे यांचा हा चित्रपट मुख्य कलाकारांसाठी इमेज ब्रेकिंग ठरणार आहे.

हे देखील वाचा- कार्तिक आर्याने चाहत्यांचे मानले आभार ‘भूल भुलैया 3’ने केला २०० कोटींचा आकडा पार!

‘श्री गणेशा’ या चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांची असून पटकथा मिलिंद यांनी संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांना सुमधूर संगीतसाज चढवण्याचं काम संगीतकार वरुण लिखते यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं असून, संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. अंकित चंदिरामानी यांचा सनशाईन स्टुडिओज हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वितरीत करणार आहे.

Web Title: Shashank shendye sanjay narvekar prathamesh parab starrer shri ganesha poster released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • Shashank Shende

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.