फोटो सौजन्य - युट्युब
राजकुमार राव-शेहनाज गिल : राजकुमार राव आणि तृप्ती दिमरी यांचा आगामी सिनेमा “विकी विद्या का वो वाला व्हिडिओ” ची चर्चा सध्या प्रचंड सुरु आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन राजकुमार राव आणि तृप्ती दिमरी सध्या करत आहेत. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राज शांडिल्य यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे, तर भूषण कुमार चित्रपटाचे निर्माते आहेत. आता निर्मात्यांनी ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ मधील ‘सजना वे सजना’ हे नवीन गाणे रिलीज केले आहे, जे दिव्या कुमारसह सुनिधी चौहानने गायले आहे. या चित्रपटाचे नवे गाणे युट्युबवर प्रदर्शित झाले आहे.
बिग बॉस फेम आणि पंजाबची अभिनेत्री शेहनाज गिल आता विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या सिनेमामध्ये दिसणार आहे. अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल ‘सजना वे सजना’ गाण्यात जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्यात राजकुमारची झलकही पाहायला मिळत आहे. ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ हा १९९० च्या दशकातील रेट्रो थीमवर आधारित कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाशी टक्कर देणार आहे.
Le teri ho gayi yaar… sajna ve sajna! 😉#SajnaVeSajna Song Out Now!
🔗 – https://t.co/uPlGAYegUS #VickyVidyaKaWohWalaVideo in cinemas this Friday.@ishehnaaz_gill @RajkummarRao @tripti_dimri23 @writerraj #BhushanKumar #KrishanKumar #ShobhaKapoor @EktaaRKapoor… pic.twitter.com/aANZJCnbgh — Shehnaaz Gill (@ishehnaaz_gill) October 7, 2024
विकी-विद्याचा सर्वसामान्यांसाठी खास संदेश
चित्रपटाच्या कथेवर आधारित, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांनी सामान्य लोकांना ऑनलाइन आणि सायबर सुरक्षेबद्दल जागरूक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांशी हातमिळवणी केली आहे. बॉलीवूड स्टार्सनी सायबर क्राईमबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा हा व्हिडिओ त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे.