Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली, कलाकारांसोबत रंगली सुरेल संगीत मैफल!

पुणे शहरातील महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशन अंतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 11, 2024 | 07:03 PM
पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली, कलाकारांसोबत रंगली सुरेल संगीत मैफल!

पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली, कलाकारांसोबत रंगली सुरेल संगीत मैफल!

Follow Us
Close
Follow Us:

पुणे शहरातील महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशन अंतर्गत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या अनोख्या रॅलीत ‘गुलाबी’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रुती मराठेने सहभाग घेतला होता. महिलांनी गुलाबी रंगाच्या पारंपरिक पेहरावात सजून आपल्या दुचाकींसह रॅलीत सहभाग घेतला आणि चित्रपटाच्या गुलाबी थीमला उजाळा दिला.

रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथून झाली, ज्यात महिलांचा उत्साह ओसंडून वाहात होता. रॅलीचा मार्ग करिष्मा चौक, सीडीएसएस चौक, आणि डीपी रोड मार्गे शुभारंभ लॉन्स येथे समाप्त झाला. गुलाबी फेटे घातलेल्या महिलांनी आणि दुचाकींवरून निघालेल्या या रॅलीने पुण्याच्या रस्त्यांवर एक वेगळीच रंगत आणली होती.

हे देखील वाचा- ‘जुबां केसरी’मुळे सिंघमची सटकली, मीम्स- ट्रोलर्सला मुलाखतीतून दिले ‘हे’ उत्तर

रॅलीनंतर मंदार बलकवडे आयोजित ‘गुलाबी Live’ कार्यक्रमात चित्रपटातील संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात संगीत मैफलीचे सादरीकरण करण्यात आले. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील संवादाने कार्यक्रमाला एक वेगळा रंग दिला. श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी यांच्यासह कार्यक्रमात आदिती द्रविड, अभ्यंग कुवळेकर आणि सावनी राजेंद्र, हंसिका अय्यर, संगीतकार साई – पियुष यांनीही सहभाग घेतला. यावेळी चित्रपटातील गाण्यांसह इतर गाण्यांची मेजवानी होती

‘गुलाबी’ हा चित्रपट जयपूरच्या पार्श्वभूमीवर तीन मैत्रिणींच्या आयुष्याचा आणि त्यांच्या स्वप्नांचा प्रवास मांडतो. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर म्हणतात, “हा चित्रपट फक्त मैत्रीवर आधारित नसून, तर स्त्रियांच्या वैयक्तिक संघर्षांवर, त्यांच्या स्वप्नांवर आणि आत्मसन्मानाच्या शोधावर आधारित आहे. आम्ही या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आहे.”

हे देखील वाचा- अखेर ठरलं!… ‘पुष्पा २’चा ट्रेलर केव्हा रिलीज होणार ? तारीख आणि वेळ आली समोर

चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट सादर केला आहे. या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार आणि निखिल आर्या यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साई-पियुष यांनी संगीत दिलेले आहे.

‘गुलाबी’ चित्रपट हा २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या रॅली व ‘गुलाबी Live’ कार्यक्रमामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता वाढली आहे.

Web Title: Shruti marathe mrunal kulkarni and ashwini bhave starrer gulabi marathi movie team pramotion in pune with pune leadies in bike rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
4

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.