'जुबां केसरी'मुळे सिंघमची सटकली, मीम्स- ट्रोलर्सला मुलाखतीतून दिले 'हे' उत्तर
बॉलिवूड स्टार अजय देवगण सध्या ‘सिंघम अगेन’मुळे चर्चेत आहे. सध्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त बिझनेस करताना दिसत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. पण यादरम्यान, अजय आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. कारण ठरलंय, त्याची ‘जुबा केसरी’ जाहिरात… या जाहिरातीमुळे अभिनेत्यावर नेटकरी मीम्स बनवत आहेत. या मीम्समुळे अभिनेता तुफान ट्रोल होत आहे. या ट्रोलिंगवर अभिनेत्याने ट्रोलर्सला जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे.
हे देखील वाचा – अखेर ठरलं!… ‘पुष्पा २’चा ट्रेलर केव्हा रिलीज होणार ? तारीख आणि वेळ आली समोर
दरम्यान, ‘जुबां केसरी’ ही लाईन एका इलायची ब्रँडची आहे. याची जाहिरात अजय देवगण करतो. त्याच्या व्यतिरिक्त शाहरूख खान, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफही या जाहिरातीत दिसले होते. या जाहिरातीमुळे अजय ट्रोल होत असल्यामुळे त्याने ट्रोलर्सला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. रणवीर अलाहाबादिया ह्या प्रसिद्ध युट्यूबरला अभिनेत्याने मुलाखत दिली. या मुलाखतीत रणवीरने अभिनेत्याला प्रश्न विचारला की, तुझी हरकत नसेल तर मी विचारू शकतो का की या मीम कल्चरमध्ये जर तुला कोणी ‘जुबा केसरी’ म्हणत असेल तर तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देतात?
रणवीर अलाहाबादियाच्या प्रश्नावर उत्तर देताना अजय हसत म्हणाला… मला या ट्रोलिंगमुळे कोणताच फरक नाही पडत. मुलाखतीदरम्यान अजयसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टीही होता. तो म्हणतो, “सध्याच्या जमान्यात आक्षेपार्ह बोलणं बंद झालं आहे. आजकाल सर्वच मीम्स एन्जॉय करताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपल्या मित्राला विचारतातच की, अरे तू तो मीम पाहिलास का ?” अजय ज्या ब्रँडची जाहिरात करतो त्या ब्रँडचे नाव ‘जुबां केसरी’ आहे , जे एका तंबाखू उत्पादनासाठी खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी संबंधित कलाकारांनाही अनेकदा नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागते.
अजय सतत या ब्रँडसोबत जोडलेला आहे, त्याच्यानंतर अक्षय कुमारही या ब्रँडचा ॲम्बेसेडर बनला आहे. पण काही काळानंतर, अक्षयने तंबाखू उत्पादनांच्या विक्रीसाठी लोकप्रिय असलेल्या या ब्रँडसोबतचा करार संपवला कारण त्याला यासाठी खूप ट्रोल होऊ लागले. तर शाहरुख खानही गेल्या वर्षी कधीतरी या ब्रँडमध्ये सामील झाला होता. अलीकडे टायगर श्रॉफही या ब्रँडशी जोडला गेला आहे.