Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठमोळ्या अभिनेत्याचं नाटक पाहण्यासाठी आला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

सध्या शुभंकर एकबोटे ‘Runaway Brides’ नाटकामुळे चर्चेत आहे. हे नाटक पाहण्यासाठी आमिरने उपस्थिती लावली होती. शुभंकरने अमिरसोबतच्या भेटीदरम्यानचा अनुभव भलीमोठी पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 07, 2025 | 04:28 PM
मराठमोळ्या अभिनेत्याचं नाटक पाहण्यासाठी आला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

मराठमोळ्या अभिनेत्याचं नाटक पाहण्यासाठी आला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

जीवनात एकदा तरी आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटायचं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग तो कोणीही असो सामान्य माणूस किंवा एखादा कलाकार. अशाच एका मराठी अभिनेत्याचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. अभिनेता शुभंकर एकबोटेचं आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ज्याचे चित्रपट पाहून शुभंकर लहानाचा मोठा झाला, ज्याचा अभिनय पाहून अभिनयाबद्दल मनात आवड निर्माण झाली अशा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने अभिनेता शुभंकर एकबोटे भारावून गेला आहे.

सध्या शुभंकर एकबोटे ‘Runaway Brides’ नाटकामुळे चर्चेत आहे. हे नाटक पाहण्यासाठी आमिरने उपस्थिती लावली होती. यावेळी नाटकात भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं आमिरने बारकाईने लक्ष देऊन कौतुक केल्याचं शुभंकरने सांगितलं आहे. शुभंकरने अमिरसोबतच्या भेटीदरम्यानचा अनुभव भलीमोठी पोस्ट शेअर करत सांगितला आहे.

एक खून अनेक आरोपी, सुभेदारांच्या जावयाच्या हत्येचं रहस्य उलगडणार; ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर भेटीला

 

शेअर केलेल्या पोस्टमध्ये शुभंकर एकबोटे म्हणतो,

“काबिल बनो काबिल… कामयाबी झक मारके पीछे आएगी
No Words To Express My Happiness & Gratitude For These Moments!
माझा जन्म १९९४ चा आणि मला माझ्या आई-बाबांनी अगदी लहानपणापासून मोठ्या पडद्यावर Theatre मध्ये जाऊन बरेच हिंदी-मराठी चित्रपट दाखवले. कदाचित आज मी या क्षेत्रात असण्यामागे काही महत्त्वाच्या कारणांपैकी तेच एक कारण असावं. लहानपणीच्या काही आठवणी एकदम Strong Images बनून आपल्या मनात कायम घर करून राहतात. 75mm च्या मोठ्या पडद्यावर अगदी पहिला चित्रपट जो मला दाखवला गेला तो होता ‘रंगीला’.

‘रंगीला’मधला ‘मुन्ना’ ते ‘लालसिंग चड्ढा’मधला ‘लालसिंग’ हा संपूर्ण प्रवास बघत मी लहानाचा मोठा झालो. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर Mr. Perfectionist ने त्याच्या प्रत्येक भूमिकेतल्या रंगीबेरंगी छटांनी माझ्या मनाला भुरळ घातली. मला त्याच्या कामाच्या प्रेमात पडायला लावलं. खरं सांगतो, जेव्हा त्यांना मी त्यांच्या Seat वर जाऊन बसताना बघितलं तेव्हा काही क्षण काहीच सुधरलंच नाही. मनात एकाच वेळी त्याने साकारलेली प्रत्येक Iconic भूमिका दिसायला लागली आणि त्यांची खास गाजलेली वाक्य घुमायला लागली! स्वतःला एकवटून सांगितलं की, आपल्याला फक्त आपलं काम मनापासून जीव ओतून करत राहायचं आहे समोर कोणीही असो… कदाचित हेच त्याने स्वतःला सांगितलं म्हणून आज तो Mr.Perfectionist आहे !

ज्या माणसाला आजपर्यंत आपण मोठ्या पडद्यावर बघितलं तो स्वतः प्रेक्षकांमध्ये बसून शांतपणे माझं काम बघतोय, आमचं नाटक Enjoy करतोय आणि नाटक संपल्यावर आमच्या संपूर्ण Team चं कौतुक करतोय, प्रत्येकाला जातीने आवर्जून त्याच्या/तिच्या कामाची दाद देतोय हे बघून इतकंच जाणवलं की यशाने कितीही मोठी उंची गाठली तरी तुमची मुळं जर मजबूत असतील तर प्रत्येक जण Perfectionist होऊ शकतो.

प्रेक्षकांनो! तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार! २०२५ ची सुरुवात हाऊसफुल्ल शोने झालेली आहे. याचं क्रेडिट आमच्या ‘Runaway Brides’ या संपूर्ण टीमचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून इतकी मोठी संधी दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे मनापासून आभार.”

निस्तेज चेहरा अन् विस्कटलेले केस… डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण; पाहा Photo

Web Title: Shubhankar ekbote meets aamir khan writes special post for mr perfectionist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास
2

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.