आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. जुनैद खान या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे जिथे तो एका निर्भय पत्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने इंटरनेटला आग लावली आहे कारण त्यात जुनैद खान आणि जयदीप अहलावत आहेत. ‘महाराज’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाचे लेखन विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी केले आहे.
तत्पूर्वी प्रकल्पाचे वर्णन करताना सिद्धार्थ मल्होत्रा यांनी सांगितले आहे की हा चित्रपट १८०० च्या दशकातील आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरवर दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे, “एक शक्तिशाली माणूस आणि निर्भय पत्रकार यांच्यातील सत्यासाठी लढा. सत्य घटनांवर आधारित – महाराज १४ जून रोजी प्रदर्शित होत आहे. असे त्याने प्रेक्षकांना या पोस्टद्वारे सांगितले आहे.
तसेच पुढे म्हणाले की, हा एक असा चित्रपट आहे जो मानवी आत्म्याची लवचिकता दर्शवितो आणि एक सामान्य माणूस त्याच्या सभोवतालच्या लोकांना मदत करण्याचे धैर्य कसे दाखवू शकतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. आणि कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात समाजाला मदत करू शकतो. घोडागाडी, जुन्या शाळेच्या छपाईच्या जगात मंत्रमुग्ध होण्यासाठी सज्ज व्हा, कच्चा रस्ता, सुंदर परंपरा आणि माणसाची चांगली काम करण्याची इच्छाशक्ती या सर्व गोष्टी नेटफ्लिक्सवर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे, आमची कथा जगासमोर नेण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ मिळाले आहे,” असे त्यांनी सांगतले आहे.
[read_also content=”36 डे मधून अमृता पुन्हा दिसणार बॉलिवुड मधल्या या कलाकारांसोबत ! https://www.navarashtra.com/entertainment/amruta-khanvilkar-will-be-seen-again-in-36-days-with-these-bollywood-actors-539849/”]
हा चित्रपट १४ जून ला रिलीज होणार असून, या चित्रपटाची चाहूल आतापासूनच प्रेक्षकांना लागली आहे. जुनैद खानचा हा पहिला चित्रपट असून तो त्याची पहिला भूमिका प्रेक्षकांच्या सांवर घेऊन येण्यासाठी सज्ज आहे. तसेच या चित्रपटात त्याची जयदीप अहलावत यांच्यासोबतच जुनैद खान हा मुख्भूमिकेत दिसत आहे. याचदरम्यान या प्रोजेक्टमध्ये सहकलाकार जयदीप अहलावत शर्वरी वाघ आणि शालिनी हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.






