Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fortune 100 Most Powerful Women: प्रभावशाली महिलांच्या यादीत स्मृती इराणी; महिलांसाठी दिला प्रेरणादायी संदेश

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा Fortune 100 Most Powerful Women यादीत समावेश झाला आहे. या सन्मानानंतर त्यांनी जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी संदेश दिला. जाणून घ्या त्यांनी नेमकं काय म्हटलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 14, 2026 | 03:53 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून ‘तुलसी’ म्हणून घराघरांत पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी अभिनयापासून राजकारणापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला आहे. आता त्यांच्या या बहुआयामी योगदानाची दखल घेत फॉर्च्युन मासिकाने त्यांना ‘100 Most Powerful Women’ (100 सर्वात प्रभावशाली महिला) या प्रतिष्ठित यादीत स्थान दिले आहे.

स्मृती इराणी यांनी भारतीय मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. भारत सरकारमध्ये त्यांनी महिला व बालविकास, अल्पसंख्याक व्यवहार, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण आणि मानव संसाधन विकास यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वशैली, जनसेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे.

फॉर्च्युनच्या यादीत स्थान मिळाल्यानंतर स्मृती इराणी यांनी जगभरातील महिलांना प्रेरणादायी संदेश दिला. त्या म्हणाल्या, “प्रत्येक महिलेसाठी माझा संदेश स्पष्ट आहे—तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. महिला स्वतःसाठी उंच निकष ठरवतात, स्वतःशीच स्पर्धा करतात आणि सतत पुढे जात राहतात. उर्वरित जग त्यांच्या बरोबरीने येण्याचा प्रयत्न करत असते.”

Dhurandhar 2: भारतात ब्लॉकबस्टर, जपानमध्ये फुस्स! रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’ला पहिल्याच दिवशी अवघे 900 प्रेक्षक

अभिनय, राजकारण आणि सामाजिक नेतृत्व या तिन्ही क्षेत्रांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या स्मृती इराणी यांनी अलीकडेच तब्बल २५ वर्षांनंतर ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. त्यांच्या पुनरागमनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालिका टीआरपीमध्येही चांगली कामगिरी करत असल्याची चर्चा आहे.

अभिनेत्री, नेत्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अशी बहुआयामी ओळख असलेल्या स्मृती इराणी यांच्या या जागतिक सन्मानामुळे भारतीय महिलांसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

Kamali : ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट! सरोजचं पात्र संपणार? गोळी लागण्याच्या सीननंतर योगिनी चौकने सांगितली मनातील भीती

Web Title: Smriti irani featured in fortunes 100 most powerful women list shares a special message for women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर
1

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर

Nikki Tamboli Arbaaz Patel Breakup: जन्मोजन्मी साथ निभवण्याची शपथ, पण लग्नाआधीच अरबाज-निक्कीचा ब्रेकअप! नेमकं काय घडलं?
2

Nikki Tamboli Arbaaz Patel Breakup: जन्मोजन्मी साथ निभवण्याची शपथ, पण लग्नाआधीच अरबाज-निक्कीचा ब्रेकअप! नेमकं काय घडलं?

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा
3

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
4

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.