सोनाक्षी सिन्हाआणि झहीर इकबाल या दोघांच्या लग्नाच्या चर्चा बॉलीवूड इंडस्ट्री आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होताना दिसत आहे. तसेच १० जून ला समोर आले होते की, हे दोघे लग्न करून लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. परंतु या बातमी वर कोणाचाही विश्वास बसला नाही. याचदरम्यान या दोघांची लग्न पत्रिकासुद्धा समोर आल्या आहेत. ही पत्रिका पाहून आता असे समोर आले आहे की, हे दोघे आता २३ जून रोजी लग्न करणार आहेत.
सोनाक्षी आणि झहीर या दोघांची लग्नपत्रिका
सोनाक्षी आणि क्सझहीर या दोघांची लग्नपत्रिका ही रेड्डीटवर व्हायरल होताना दिसत आहे. या मध्ये एक ऑडिओ क्यूआर कोडसह ही पत्रिका दिसत आहे. या ऑडिओमध्ये सोनाक्षी आणि झहीरचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. या ऑडिओमध्ये सुरवातीला सोनाक्षीचा आवाज ऐकू येत आहे. ती म्हणते की, “आमच्या सर्व हिप, तंत्रज्ञान जाणकार आणि गुप्तहीर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना नमस्कार.”
Sonakshi & Zaheer, wedding confirmed on June 23! ?
byu/FleaBird_ inBollyBlindsNGossip
यानंतर लगेच मागून झहीरचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणतो की, गेल्या ७ वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आपला आनंद, प्रेम, आशा आणि अनेक रोमांच आम्हाला येथपर्येंत घेऊन आहे आहेत. आता आम्ही बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड मधून एकमेकांचे पक्के पती-पत्नी बनायला जातो आहोत. हा उत्साह तुमच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे २३ जून रोजी सगळी हातातली कामे सोडून आमच्यासोबत पार्टीत सहभागी व्हा, येथेच भेटूयात.
हे दोघे रजिस्टर लग्न करणार
झूम च्या वृत्तानुसार, सांगण्यात आले आहे की हे दोघे रजिस्टर लग्न करणार आहेत. या नंतर या दोघांच्या लग्नाची रिसेप्शशन पार्टी ठेवण्यात आली आहे. तसेच या लग्नाच्या पत्रिकेत लिहिले आहे की, मुंबईमधील रेस्टॉरंट बास्टियन या ठिकाणी एक इव्हेंट होस्ट करण्यात आला आहे. या पार्टी मध्ये हिरामंडी स्टारसुद्धा सहभागी असणार आहेत असे समजले आहे. तसेच ऍक्टर आयुष शर्मा, हुमा कुरेशी हे सुद्धा सामील होणार आहेत. तसेच सांगण्यात येत आहे की, या सगळ्यांना लग्न पत्रिकासुद्धा पोहचल्या आहेत.