Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस एक नवीन वेब सिरीज येणार आहे. सोनी लिव्हवर ही वेब सिरीज येणार असून याचे नाव ‘ब्‍लॅक व्‍हाइट अँड ग्रे - लव्‍ह किल्‍स' असे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 24, 2025 | 09:49 PM
गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा

गुंतागुंतीचे पात्र आणि तितकीच हिडन स्टोरी ! सोनी लिव्हच्या आगामी सिरीजची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

सोनी लिव्‍हवरील आगामी डॉक्‍यूमेण्‍टरी-ड्रामा ‘ब्‍लॅक व्‍हाइट अँड ग्रे – लव्‍ह किल्‍स’ येत्या 2 मे रोजी प्रदर्शित होण्‍यापूर्वीच प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. रोमांचक कथानक आणि नैतिकदृष्‍ट्या गुंतागगूंतीच्‍या पात्रांसह ही सिरीज प्‍लॅटफॉर्मवरील बहुप्रतिक्षित बनली आहे.

ही सिरीज रीलीज होण्‍यापूर्वीच कलाकारांना प्रेक्षकांकडून अनेक संदेश मिळत आहेत, जे या सिरीजमधील मुख्‍य रहस्‍याचा उलगडा पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहेत. तर्क, सिद्धांत व संशयाने भरलेल्‍या या सिरीजला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांनी कथानकाबाबतचे गुपित लपवून ठेवले आहे, तसेच ते उत्‍साही, हलक्‍या-फुलक्‍या प्रतिसादांसह प्रेक्षकांशी एकरूप होत आहेत, त्‍यांना आठवण करून देत आहेत की सिरीज प्रसारित झाल्‍यानंतर सर्व गोष्‍टींचा उलगडा होईल.

‘हिंदू-हिंदू का म्हणत आहात?’, पहलगाम हल्ल्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांच्या विधानावर संतापले लोक, म्हणाले- ‘तुमचा जावई…’

या सिरीजमध्‍ये महत्त्वाची भूमिका साकारणारी पलक जैस्‍वाल म्‍हणाली, “आम्‍हाला सिरीज रीलीज होण्‍यापूर्वीच मिळत असलेले मेसेजेस पाहून मी भारावून गेले आहे. प्रेक्षक कथानकाचा उलगडा करण्‍याचा, रहस्याचा उलगडा करण्‍याचा आणि खऱ्या गुन्‍हेगाराबाबत अंदाज लावण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. सिरीज रीलीज होण्‍यापूर्वी त्‍यांनी दाखवलेला हा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद पाहून खूप आनंद होत आहे.”

रहस्‍याच्‍या अवतीभोवती असलेली प्रमुख भूमिका साकारणारा मयूर मोरे म्‍हणाला, “प्रत्‍येकवेळी कोणीतरी मला ‘तू किलर आहेस का!’ असे विचारल्‍यानंतर मी फक्‍त हसतो आणि म्‍हणतो की सिरीज पहा. ‘ब्‍लॅक व्‍हाइट अँड ग्रे’ची खासियत म्‍हणजे कोणीही पूर्णत: चांगला किंवा वाईट नाही आणि सत्‍य, नेहमीच खरे किंवा खोटे नसते.”

मुनव्वर फारुकीची Laughter Chefs 2 मध्ये होणार एन्ट्री? एल्विशशी जागा घेणार कॉमेडियन?

ही सिरीज जिद्दी पत्रकार डॅनियल गॅरीच्‍या अवतीभोवती फिरते, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्‍वभूमीतील तरुणाशी संबंधित असलेल्या खुनाचा उलगडा करण्‍याच्‍या मोहिमेवर आहे. डॅनियल तपासात खोलवर जाताना भ्रष्‍टाचार, पितृसत्ता आणि सामाजिक दुफळीचे जाळे उघड करतो, सत्य आणि न्यायाच्या गुंतागूंती उलगडत असताना अपराधीपणा व निर्दोषतेमधील तफावतींना निदर्शनास आणतो.

पुष्‍कर सुनिल महाबल दिग्‍दर्शित ‘ब्‍लॅक, व्‍हाइट अँड ग्रे – लव्‍ह किल्‍स’चे निर्माते स्‍वरूप संपत आणि हेमल ए. ठक्‍कर आहेत. तिग्‍मांशू धुलियासह या सिरीजमध्‍ये नवीन व प्रतिभावान कलाकार आहेत, जसे मयूर मोरे, पलक जैस्‍वाल, देवेन भोजानी, एडवर्ड सोनेनब्लिक, हक्किम शाहजहान, अनंत जोग, कमलेश सावंत आणि इतर कलाकार पाहायला मिळणार आहे. ‘ब्‍लॅक, व्‍हाइट अँड ग्रे – लव्‍ह किल्‍स’ची रोमांचक कथा येत्या 2 मेपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Sony liv web series black white gray love kills will be releasing on 2nd may 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • crime web series
  • Entertainment News
  • Sony Liv

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
1

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
2

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
3

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
4

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.