Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनी मराठीवर रंगणार किर्तनावर आधारित भारतातील पहिला रिॲलिटी शो, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफीचं अनावरण…

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिॲलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या किर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 26, 2025 | 02:48 PM
सोनी मराठीवर रंगणार किर्तनावर आधारित भारतातील पहिला रिॲलिटी शो, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफीचं अनावरण…

सोनी मराठीवर रंगणार किर्तनावर आधारित भारतातील पहिला रिॲलिटी शो, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफीचं अनावरण…

Follow Us
Close
Follow Us:

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या भारतातील पहिल्या रिॲलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या किर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या रिअ‍ॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतच संपन्न झालं. याप्रसंगी सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी, विविध संतांचे वंशज, या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालक गीतकार ईश्वर अंधारे आणि परीक्षक ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील आणि ह.भ.प. राधाताई सानप आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

सई ताम्हणकर देणार चाहत्यांना सुखद धक्का, पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर! ‘देवमाणूस’मध्ये दिसणार झलक

ह.भ.प. राधाताई सानप यांनी त्यांच्या किर्तनातून शिक्षण आणि इतर सामाजिक क्षेत्रात सामाजिक जागरूकता निर्माण करून महासांगवी संस्थानला वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. तर ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांनी किर्तनातून शिक्षण आणि सामाजिक जागरूकता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. भक्तीचे पावित्र्य जपत ते अबाधित ठेवण्याची जबाबदारी आणि परंपरा जपल्याबद्दल महाराष्ट्रातील आदरणीय संतांच्या सर्व वंशजांचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आला.

ह.भ.प. माधव महाराज नामदास, पंढरपूर (संत नामदेव महाराजांचे वंशज), ह.भ.प. रविकांत महाराज वसेकर, ह.भ.प. जब्बार महाराज शेख (संत शेख महंमद यांचे वंशज), ह. भ. प. बापूसाहेब महाराज देहूकर, देहू (संत तुकाराम महाराजांचे वंशज), ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, सुदुंबरे (संताजी जगनाडे महाराजांचे वंशज), ह.भ.प. गोपाळबुवा मकाशिर, पिंपळनेर (निळोबाराय महाराजांचे वंशज), ह.भ.प. प्रमोद पाठक, शिऊर (संत बहिणाबाईंचे वंशज) आदि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले.

Aatli Baatmi Phutli Movie: ‘आतली बातमी फुटली’ चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, सोनी मराठी वाहिनीने अतिशय अभिनव अशाप्रकारची संकल्पना मांडली आहे. आज या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आशीर्वाद महत्तवाचे असून या सगळ्यांचे मनापासून आभार की या अतिशय सुंदर संकल्पनेला या सर्वांचा पाठिंबा लाभला आहे. आमची समृद्ध अशी जुनी किर्तन परंपरा आहे. आजच्या कीर्तनकारांनी आपल्या निरूपणातून, किर्तनतून समाजाला चांगले विचार देत केलेलं समाजप्रबोधन हे खऱ्या अवर्णनीय आहे. जग इतक्या झपाट्याने पुढे चाललं आहे त्यावेळेस लोकांना प्रश्न पडायचा आपली समृद्ध परंपरा जिवंत राहील का ? पण ज्यावेळेस मी अशा प्रकारचे अतिशय तरुण कीर्तनकार पाहतो, त्यावेळेस मला खात्री वाटते की आमची सनातन परंपरा कधीच संपू शकत नाही, तिचा नाश होऊ शकतं नाही. “महाराष्ट्राचा समृद्ध आध्यात्मिक वारसा ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि किर्तन या परंपरेचा आत्मा आहे. किर्तन परंपरेने भक्तिरसपूर्ण आणि रसाळ कथाकथनाच्या माध्यमातून पिढ्यान् पिढ्या लोकांचे प्रबोधन केले आहे, त्यांचे उत्थान केले आहे आणि त्यांना एकत्र आणले आहे. या परंपरेचा सन्मान करून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा मंच सादर केल्याबद्दल मी सोनी मराठी वाहिनीचे मनापासून कौतुक करतो. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा केवळ एक शो नाही तर ती एक सांस्कृतिक चळवळ आहे, जी महाराष्ट्राचा पवित्र वारसा जिवंत ठेवेल आणि त्याची भरभराट करेल.”

मुंबई पोलिसांनी आणखी वाढवल्या कुणाल कामराच्या अडचणी, कॉमेडियनचे फेटाळले ‘हे’ आवाहन!

याप्रसंगी बोलताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे एमडी आणि सीईओ गौरव बॅनर्जी म्हणाले, “सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने कायमच खोलवर परिणाम साधणाऱ्या प्रामणिक कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर हा महाराष्ट्राचा अध्यात्मिक वारसा सांगणारा अनोखा उत्सव आहे. किर्तन हे तमाम भारतीयांच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक जीवनाचे भरणपोषण करणारे महत्त्वाचे केंद्र आहे. ‘विणुया अतुट नाती’ या आमच्या ब्रीदवाक्याशी साधर्म्य सांगत ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा शो आमच्या प्रेक्षकांशी असलेला भावनिक बंध अधिक दृढ करत भक्तीचे पावित्र्य जपत, ते अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणारा असेल. किर्तनाची अवीट गोडी आणि संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशानं आम्ही हे अनोखं पाऊल उचलल्याचं सांगताना ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या आगळ्यावेगळ्या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून किर्तनाचा वसा आणि वारसा प्रत्येक घराघरांत पोहोचवण्यास मदत होणार आहे.

‘त्याच्या कानाखाली मारायला हवी…’ आशा भोसलेने संतापून हिमेश रेशमियाला दिली होती धमकी, आता अनेक वर्षानंतर गायकाचा प्रतिसाद!

महाराष्ट्राच्या राजकारणाचे, समाजकारणाचे आणि धर्मकारणाचे अभ्यासक, संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार डॉ.सदानंद मोरे यांचं मोलाचं मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभणार आहे. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवाकोरा रिअ‍ॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे.

Web Title: Sony marathi channel is presenting indias first reality show based on kirtan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • cm of maharashtra
  • marathi film
  • Marathi Film Industry
  • New Marathi Serial
  • tv serial

संबंधित बातम्या

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;
1

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पसायदानाद्वारे अखिल…”;

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध
3

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

Devendra Fadnavis: “गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.