Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्राने मला खूप दिलंय, आता परतफेड करायची वेळ आलीय…”; सुभाष घईंच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा, पोस्टर रिलीज

एका हृदयस्पर्शी नवीन विषयासह सुभाष घाई यांच्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 30, 2025 | 03:14 PM
"महाराष्ट्राने मला खूप दिलंय, आता परतफेड करायची वेळ आलीय..."; सुभाष घईंच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा, पोस्टर रिलीज

"महाराष्ट्राने मला खूप दिलंय, आता परतफेड करायची वेळ आलीय..."; सुभाष घईंच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा, पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा एखादा चित्रपट चांगला आशय देतो तेव्हा तो प्रेक्षकांना आकर्षित करतो. मराठी सिनेमे सध्या संपूर्ण देशभरात आणि जगभरात प्रचंड यश मिळवत आहे. असाच एका हृदयस्पर्शी नवीन विषयासह सुभाष घाई यांच्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट “अमायरा” आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

Housefull 5 Teaser: धमाकेदार कॉमेडीसह परतला अक्षय कुमार, मजामस्तीसोबत सस्पेन्सचाही होणार धमाका!

पोस्टरवर आपण आपल्या लाडक्या मराठी कलाकारांना पाहू शकतो. अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत हे मराठी सिनेश्रुष्टीतील उत्तम कलाकार असून त्यांचं काम प्रेक्षकांनी अनुभवलंय आणि त्यांना भरपूर प्रेम सुद्धा दिलंय. पण विशेष आकर्षण ठरते ती म्हणजे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सई सचिन गोडबोले. पोस्टर वरून अंदाजा येतो कि ह्या सिनेमाचं चित्रीकरण बाहेरदेशात केलं गेलाय. पण नक्की सईचं अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव आणि पूजा सावंत सोबतचं नातं काय? या कलाकारांची चित्रपटात काय भूमिका असणार आहे ? हे येत्या १६ मे २०२५ ला कळेल.

 

Raid 2 रिलीज होण्याआधीच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल समोर आले अपडेट, Raid 3 होणार कन्फर्म?

यावेळी सुभाष घाई ह्यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं “मुक्ता आर्टस् चा नवा मराठी सिनेमा अमायरा १६ मे ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मला आनंद आहे की सिनेमा खूप चांगला बनवला गेला आहे, छान म्युजिक आहे, सर्वानी छान ॲक्टिंग केलंय. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कलेचा फॅन आहे. महाराष्ट्रने मला सुरुवातीपासून खूप काय दिलं आहे त्यामुळे माझं हे कर्तव्य होतं कि मी त्याची परतफेड करू. तसेच मी २००६ पासून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने फिल्म सिटीमध्ये व्हिसलिंगवुड्सची स्थापना केली. आमच्याकडे तब्बल ४००० संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातील माजी विद्यार्थी आहेत जे चित्रपट निर्मितीत सध्या काम करत आहेत. आम्हाला व्हिसलिंगवुड्सच्या ॲक्टिंग स्टुडिओमधील आमची मुख्य अभिनेत्री सई गोडबोले हिचा अभिमान आहे. आम्ही मुक्ता आर्ट्स अंतर्गत एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वळू’ देखील तयार केला. मी खूप खुश आहे कि आज मुक्ता आर्टस् च्या माध्यमातून आम्ही मराठी सिनेसृष्टीत जागा निर्माण करतोय. ‘अमायरा’ मध्ये दिग्दर्शक आणि सह निर्मात्यांनी उत्तम काम केलय. मी आशा करतो कि ह्या पुढे सुद्धा मी नव नवीन मराठी सिनिमे बनवत राहील.”

Dadasaheb Phalke Birth Anniversary: सर्वस्वाचा त्याग करून चित्रपटसृष्टीचे बनले जनक, समाजाविरुद्ध लढून महिलांना दिली संधी!

अद्भुत आणि उत्तम कलाकारांसोबत सईची जुगलबंदी बघण्यासारखी असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे असून लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तर सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल आहेत. या सिनेमाला संगीत रोहित राऊत ने दिलं आहे. ‘अमायरा’ हा चित्रपट १६ मे २०२५ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Subhash ghai announce new marathi movie amayra staring kishori godbole daughter sai godbole

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • ajinkya deo
  • marathi actress
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…
1

भाडिपाचा सारंग, फुलपाखरू ऋता एकत्र! ‘आली मोठी शहाणी’ सिनेमाची घोषणा…

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर
2

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार
3

अखेर स्वप्नांची नगरी मुंबईत अभिनेत्री मीरा जोशीचं ‘स्वतःचं घर’ झालं साकार

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!
4

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.