(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘हाऊसफुल’ या विनोदी चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे. आता ‘हाऊसफुल ५’ चा टीझर व्हिडिओ देखील रिलीज झाला आहे. टीझर व्हिडिओमध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, फरदीन खान, श्रेयस तळपदे, चित्रांगदा सिंग, दिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, निकितिन शर्मा, जॅक धीरो, निकितिन शर्मा, संजय दत्त आणि नाना पाटेकर यांसारख्या स्टार्सनी भरलेला आहे. या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
‘हाऊसफुल ५’ चा टीझर खूप धमाकेदार आहे
यावेळी चित्रपटात कॉमेडीसोबतच सस्पेन्स आणि ग्लॅमरही भरपूर प्रमाणात दिसून येणार आहे. टीझर व्हिडिओ पाहूनच चित्रपट किती मजेदार असणार आहे याचा अंदाज येत आहे. पार्टीसोबतच टीझरमध्ये हत्येच्या गूढतेची झलकही दाखवण्यात आली आहे. क्रूझवर बरेच मजेदार सीन पाहायला मिळणार आहे. क्रूझवर खूप मजा, नाच, गाणे आणि विनोद पाहायला मिळणार आहे, पण जेव्हा याच ठिकाणी खून होतो तेव्हा समस्या निर्माण होतात आणि ही धमाल पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
Raid 2 रिलीज होण्याआधीच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल समोर आले अपडेट, Raid 3 होणार कन्फर्म?
‘हाऊसफुल ५’ मध्ये हत्येचे गूढ उलगडणार
टीझरमध्ये एक खुनी दिसतो आहे, जो आपली ओळख लपवण्यासाठी मास्क घालून आहे. तसेच एका माणसाला गुपचूप चाकूने वार करून मारतो आणि त्याचा मृतदेह सर्वांच्या मध्ये पडतो. आता हा मारेकरी कोण आहे? संपूर्ण कथा त्याभोवती फिरणार आहे. तसेच, टीझरमध्ये ऐकलेले गाणे देखील खूपच मनोरंजक आहे. असे दिसते की चित्रपट ताजेपणा आणि उर्जेने भरलेला दिसत आहे. अक्षय, रितेश आणि अभिषेक यांचा डान्स हा या टीझरमधील मुख्य आकर्षण आहे, तिघांची केमिस्ट्री पुन्हा एकदा एकत्र पाहताना मज्जा येत आहे.
मेलबर्न कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करने रडायचे केले होते नाटक? आयोजकांनी केला धक्कादायक खुलासा!
‘हाऊसफुल ५’ चा टीझर आहे खास
‘हाऊसफुल ५’ ची सर्वात खास गोष्ट म्हणजे चित्रपटातील प्रत्येक अभिनेता ज्यासाठी प्रसिद्ध आहे ते सीन करताना दिसले आहेत. जसे जॉनी लिव्हर कॉमेडी करत आहे आणि निकितिन धीर खलनायकाच्या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे. रणजीतही पुन्हा एकदा त्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे, ज्याला पाहून अभिनेत्री घाबरतात. जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंग आणि सौंदर्या शर्मा यांचे ग्लॅमर ६ जून रोजी चाहत्यांना चित्रपटगृहात नक्कीच आकर्षित करणार आहे.