“गप्प नाही बसायचं…”, अभिनेत्याचे अश्लील मेसेज प्रकरण; प्राची पिसाटला मराठी इंडस्ट्रीतून पाठिंबा
‘तू चाल पुढं’ फेम प्राची पिसाट (Prachi Pisat) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्यावर मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीळकर (Sudesh Mhashilkar) यांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवले आहेत. त्या मेसेजेसचे स्क्रिनशॉट अभिनेत्री प्राची पिसाटने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ते मेसेजेस पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी ‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असा मेसेज केला होता.
अज्ञात महिलेकडून आदित्य रॉय कपूरच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांत तक्रार दाखल
प्राचीनं तो स्क्रिनशॉर्ट व्हायरल करताच ज्येष्ठ अभिनेत्यावर अनेक सेलिब्रिटींसह फॅन्सनेही आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. परंतु, या प्रकरणावर अद्याप अभिनेते सुदेश म्हशीळकर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अशातच सध्या सोशल मीडियावर प्राची पिसाटचं कौतुक केलं जात आहे. अनेक कलाकारांकडून प्राचीच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. प्राचीच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी केलेल्या कौतुकाचे प्राचीने सर्वांचे आभार मानले आहेत.
‘बालवीर’ फेम अभिनेत्रीला कोरोनाची लागण; म्हणाली, “खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि…”
अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णीने प्राची पिसाटच्या पोस्टवर कमेंट केली आहे, अभिनेत्री म्हणाली की, “प्राची एकदम छान केलंस हे पोस्ट करून… इंडस्ट्रीमधल्या अनेकांना वाटतं की, मुली अशाच असतात. त्यांच्यासाठी अव्हेलेबल असतात… असा विचार करणाऱ्या सगळ्यांचा गैरसमज दूर झाला पाहिजे. अशा लोकांमुळे आपली इंडस्ट्री बदनाम होतेय. आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करून आमच्या कुटुंबीयांबरोबर अगदी प्रामाणिक आहोत.” तर, अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी “वे टू गो प्राची… गप्प नाहीच बसायचं” अशी कमेंट तिच्या पोस्टवर केली आहे.
रुचिता जाधव, समीर विद्वांस, पूजा ठोंबरे, अजय नाईक, सानिका काशीकर, मीरा जगन्नाथ, श्रुती शैलेश अशा अनेक कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये तसेच प्राचीला मेसेज करत, “तुझ्या धाडसाला सलाम, तुझा अभिमान वाटत आहे” असं म्हटलं आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केले Eggs Freeze! अनेक वर्षांनंतर केला खुलासा; आईनेही दिली साथ
नेमकं प्रकरण काय आहे?
मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी त्यांच्या फेसबुकवरून प्राचीला “तुझा नंबर पाठवना, तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये… कसली गोड दिसतेयस” तर पुढच्या स्क्रिनशॉटमध्ये सुदेश म्हशिळकर म्हणतात, “खूपच सेक्सी दिसायला लागलीये, हल्ली… वाह…” असा मेसेज केला होता. प्राचीने याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत सुदेश म्हशीलकरांनी माफी मागावी असं देखील म्हटलं आहे. प्राचीला अनेक मराठी कलाकारांनी पाठिंबा देत या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.